वानरांचा बंदोबस्त करून नागरिकांना संरक्षण द्या

रमाकांत खोब्रागडे/भंडारा पत्रिका तिरोडा : तालुक्यात वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून हे वानरे चक्क घरात घुसून भाजीपाला फळे काढून तर लोकांचे घराचे आसपास लावलेले वाड्यामधून फळे भाजीपाला नासधूस करून हाकलण्यास गेल्यास नागरिकांवर हल्ले करीत असल्याने या वानरांचा बंदोबस्त करून नागरिकांना संरक्षण द्या अशी मागणी वडेगाव सह तालुक्यातील नागरिकांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार ,वन अधिकारी यांच्याकडे केली आहे.

तिरोडा तालुक्यात शहर व ग्रामीण भागात वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून दररोज हि वानरे टोळ्या टोळ्यांनी लोकांचे घरावर उड्या मारून काही वानरे घरात घुसून घरातील सामानाची नासधूस करतात तर शहरी भागात नागरिकांचे घरात घुसून फ्रिज मधील साहित्य काढून तर ग्रामीण क्षेत्रात लोकांचें घरावर उड्या मारून घराचे आसपास लावलेल्या वाड्यांचे भाजीपाला व इतर साहित्याचे नुकसान करून रस्त्यावर असलेले पान टपºया किराण्याचे दुकान फळ विक्रेता यांचे दुकानात शिरून फळे बिस्कीट पुडे व इतर साहित्य घेऊन पळतात. य घटनेमुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रस्त्यावरून एका मागोमाग बेधुंद धावत असल्यामुळे दुचाकी चार चाकी वाहन चालनाना धडक देऊन अनेक अपघात घडत असून या वानरास हाकलण्यास गेल्यास नागरिकांवर हल्ले करीत असल्याने या वानरांचा त्रासापासून नागरिकांना संरक्षण द्या अशी मागणी वडेगाव येथील रोशन बडगे, साजिद घानिवाला, डॉक्टर गिरधर बिसेन, बिहारी रहांगडाले,देवेंद्र पटले ,राहुल कोटांगले, प्रदीप बोपचे ,यांचे सह शेकडो नागरिकांचे सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार व वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *