भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : नववर्षानिमित्त नागपूर पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान एका स्कूटीमधून ४१ लाखांची रोकड जप्त केली आहे. या पैशांचा हवाला व्यवसायाशी संबंध असावा, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती आयकर विभागालाही दिली आहे. याप्रकरणी दोन तरुणांविरुद्ध शहर तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार ३१डिसेंबर रोजी नागपूर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया शिवाजी चौकाजवळ पोलीस नाकाबंदी करून रस्त्यावरून जाणाºया वाहनाची तपासणी करत होते. यावेळी पोलिसांनी स्कूटरवरून जाणाºया दोन तरुणांना अडवले. चौकशीत त्याच्या स्कूटरच्या ट्रंकमधून ४१ लाख रुपये जप्त करण्यात आले. तरुणांना पैशाचा हिशेब देता आला नाही. त्यामुळेच हा पैसा हवालाचा असल्याचा संशय पोलिसांना आहे. या कारवाईचे नेतृत्व झोन ३ चे पोलिस उपायुक्त (डीसीपी) मेहक स्वामी यांनी केले होते, जे सणासुदीच्या काळात बेकायदेशीर क्रियाकलापांना आळा घालण्यासाठी विभागाच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकत होते. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी सखोल तपास मोहीम राबवली. यावेळी अनेकांना चलनही बजावण्यात आले.
नाकाबंदी दरम्यान स्कूटरमधून ४१ लाख रुपये जप्त
