भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : लाडका भाऊ योजने अंतर्गत बेरोजगार तरुणाचे हक्कासाठी इन्सानियत फाउंडेशन च्या वतीने तहसील कार्यालय तुमसरच्या पटांगणात तरुण व तरुणींनी प्रभावी बंड पुकारला यात तहसीलदार तुमसर यांचे मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कौशल्य विकास मंत्र्याच्या अधिकाºयांना तुमसर तालुक्यातील शेकडो तरुण व तरुणींनीच्या स्वाक्षरीने मागण्यांचे निवेदन काल ३० डिसेंबर रोजी तुमसरचे तहसीलदार पेंदाम यांचे मार्फत व ईमेल द्वारे पाठविण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा सध्याचा कालावधी अपुरा असल्याने तो किमान ३ वर्षांचा करण्यात यावा, मिळणारे मानधन हे १० हजार ऐवजी २० हजार करण्यात यावे,सरकारी कर्मचाºयांसारखा आरोग्य विमा, भविष्यनिर्वाह निधी, प्रसूती सारखे लाभ देण्यात यावे,प्रशिक्षणानंतर शासकीय नोकरीची हमी देण्यात यावी या मागण्यांचा समावेश होता. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण १५ टक्के ने वाढले आहे.
बेरोजगारीमुळे तरुण चुकीच्या मार्गावर जात आहेत. रोजगार ही नोकरी नाही, तर समाजाला स्थैर्य देणारी पायरी आहे. याकडेही शासनाचे लक्ष वेधण्यात आले. सुधारणा ही केवळ मागणी नाही तरतरुणांच्या हक्काचा प्रश्न आहे, यात तातडीने बदल झाल्यास राज्यातील तरुणांना रोजगाराची नवी संधी मिळेल आणि महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीला चालना मिळेल.याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रगती राहांगडाले म्हणाल्या तर फाऊंडेशन व प्रशिक्षणार्थीच्या प्रयत्नांमुळे प्रशासन जागे होईल का असा प्रश्न उपस्थित करुन बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि कौशल्यविकास योजनेत सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा असे आवाहन हर्षल डोंगरे यांनी केले . यावेळी इनसानियत फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिकेत डोंगरे, हर्षल मलेवर, सहसचिव पंकज चौरसिया सदस्य कुणाल भोयर, प्रगती रहंगडाले को-आॅर्डिनेटर यांचा समावेश होता.