भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा २ कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यात ८५ ओडिएफ प्लस मॉडेल गावांची पडताळणी करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकारी गावात जावून ओडिएफ प्लस मॉडेल गावांची पूर्नपडताळणी करणार आहे. नुकत्याच जिल्हा परिषदेच्या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी, अधिकाºयांना २० जानेवारी पर्यंत पडताळणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने भंडारा जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा २ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत् घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे.
गावात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापानाच्या सुविधा निर्माण करण्यात आल्यामुळे भंडारा जिल्ह्यात सध्या स्थितीत ४२२ ओडिएफ प्लस मॉडेल म्हणून घोषीत करण्यात आले. त्यापैकी ८५ गावांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन सुविधांची पहाणी २० जानेवारी पर्यंत जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकारी करून पडताळणी करणार आहेत. ज्या गावांची तपासणी होणार आहे, त्यामध्ये भंडारा पंचायत समिती ८ गावे, मोहाडी ५, तुमसर २८, लाखनी ६,साकोली १४, लाखांदूर १०, पवनी १४ अशा एकूण ८५ गावांचा समावेश आहे. ओडिएफ प्लस मॉडेल गाव पडताळणी विशेष अभियानासाठी पार पडलेल्या कार्यशाळेला भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, उप मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश नंदागवळी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा. माणिक चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित अधिकाºयांना, मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी म्हणाले, नागरिकांच्या मानसिकतेमध्ये बदल करण्यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावे लागेल. त्या माध्यमातून लोकांचा सहभाग मिळून स्वच्छता वाढीस लागेल. अधिकाºयांची महिण्यातून एकदा तरी गावांना झाली पाहिजे. नागरिक व ग्रा.पं. पदाधिकांºयांशी संवाद साधला पाहिजे.
यातून गावातील स्वच्छतेबाबत वास्तविकता लक्षात येईल. काही त्रुट्या आढळून आल्यास त्यांची पूर्तता करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करता येईल. गावात जे कामे झाले त्या कामाचा आणि त्यावर झालेल्या खचार्चा ताळमेळ बघावा लागेल. वैयक्तिक व सामुदायीक व्यक्तीमत्व विकास साधून गावात स्वच्छतेची संस्कृती निर्माण करता येईल. याकरीता या विशेष अभियानाचा फायदा होईल असे श्री कुर्तकोटी यांनी सांगितले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री माणिक चव्हाण यांनी, ओडिएफ प्लस मॉडेल गावांची पतडताळणी करण्यासाठी, अधिकाºयांना घनकचरा व सांडपाणी संकलीत करावयाच्या माहिती विषयी चर्चा केली. त्यांनी, घनकचरा व्यवस्थापनांतर्गत गावात उपलब्ध कचरा विलगीकरण शेड, त्यामध्ये वर्गीकरण केले जाते का, ओल्या कचºयापासून खत तयार होते का, त्या पासून ग्रा.पं.ला उत्पनन मिळते का, वैयक्तिक व सार्वजनिक कचरा कुंड्या आहेत का, कचरा वाहन आहे का, गावात सॅनिटरी पॅड व इन्सीनेटर मशिन आहे का, तर सांडपाणी व्यवस्थापनामध्ये गावात वैयक्तिक व सार्वजनिक शोषखड्डे , बंदीस्त गटार व्यवस्था, बंदीस्त गटाराच्या शेवटी शोषखड्डा किंवा ड्रेनेज चॅनेल,
सार्वजनिक शौचालय व त्यामध्ये विद्युत, पाणी, हात धुण्याची व्यवस्था तसेच नागरिक वापर करतात का? या विषयी नागरिकांशी चर्चा करून माहिती गोळा करण्यास सांगितले. तसेच वैयक्तिक शौचालय, शालेय शौचालय,अंगणवाडी शौचालय व जल जिवन मिशन कार्यक्रमांतर्गत उपलब्ध सुविधांची माहिती घेण्याबाबत सादरीकरणाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी अतिरिक्त् मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रणदिवे, उप मुख्य कार्यकारी श्री परब, श्री नंदागवळी यांनीही स्वच्छतेबाबत अधिकाºयांना मार्गदर्शन केले.