भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा लिलाव झाला नसला तरी तिरोडा तालुक्याचे वैनगंगा नदीवरून मोठ्या प्रमाणात अवैध्य रेतीचे उत्खनन व वाहतूक होत असून अशाच प्रकारे ७ जानेवारी रोजी संध्याकाळी ६.३० वाजता चे दरम्यान चक्क तिरोडा तहसील कार्यालया समोरून टिप्पर क्रमांक एम एच ४० सीटी-४५९७ रेती भरून जात असल्याचे तहसीलदार तिरोडा यांचे लक्षात आल्यावरुन त्यांनी हा टिप्पर थांबवून चौकशी केली असता टिपर चालक आकाश धनराज कंगाले रा. कोकणागड भंडारा यास विचारपूस केली असता त्यांने हा टिप्पर अभिजीत मनोहर बांन्ते भिलेवाडा भंडारा यांचा असून ही रेती माडगी वैनगंगा नदीचे घाटावरून अवैध भरून आणली असल्याचे सांगितल्यावर तिरोडा तहसीलदार एन.एम.ठाकरे यांनी टिप्पर जप्त करून तिरोडा तहसील कार्यालयात लावून कार्यवाही केली.