भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : राज्यातील हवामानात चढउतार पहावयास मिळत आहे. आधी कडाक्याची थंडी, त्यानंतर पाऊस व थंडी असे वातावरण बदलत असताना आज, बुधवार ८ जानेवारी रोजी पुन्हा जिल्ह्यातील तापमान घसरले आहे. त्यामुळे बोचºया थंडीचा सामना गोंदियाकरांना करावा लागत आहे. हवामान खात्याकडून घेण्यात आलेल्या नोंदीनुसार गोंदियात ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात सर्वाधिक कमी तापमानात गोंदिया जिल्हा दुसºया क्रमांकावर आहे. विदर्भात सर्वाधिक किमान तापमान यवतमाळ येथे ९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. वाढलेली थंडी व शीत लहरींमुळे गोंदिया जिल्हाही पुर्तत: गारठला आहे. पहाटे धुक्याचे चादर पहायला मिळते. बोचºया थंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात ३ जानेवारीला गोंदियाचे किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले होते. त्यानंतर तापमानात वाढ होऊन नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आज पुन्हा तापमानात घसरण झाली असून गोंदियाचे कमाल तापमान २७ व किमान तापमान ९.४ अंश सेल्सिअसने नोंदले गेले. तर विदभार्तील इतर जिल्हे पाहता ९ अंशाने यवतमाळ सर्वाधिक थंड असल्याची नोंद करण्यात आली. तर अमरावती व बुलढाणा ९.८ संयुक्तपणे तिसºया क्रमांकावर आहेत.