भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तुमसर शहरातील गौतमनगर व कुंभारे नगर येथील जमीन सर्वेक्षण क्रमांक गेल्या ४० वर्षांपासून ८१२ च्या ताब्यात असलेल्या लोकांच्या जमिनी शासकीय नियमानुसार दंड आकारून पट्टे देण्याची मागणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जुम्मा कासम प्यारेवाले यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मंत्रालय मुंबई यांनाही मागण्यांचे निवेदन दिले आहे. तुमसर शहरातील गौतमनगर व कुंभारेनगर येथील कायमचे रहिवासी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. भूमिअभिलेख नझुलचे भूमापन क्रमांक ८१२ या जागेवर त्यांचे कुटुंब गेल्या ४० वर्षांपासून असून घराचे बांधकाम करून ते कुटुंबासह राहत आहेत आणि नगरपालिकेला सर्व प्रकारचे कर भरत आहेत. यासंबंधित जमिनीचा भाडेपट्टा मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभागप्रमुख अमित एच मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली संतोष उईके, ओमप्रकाश श्रीवास, शेषराम निमकर, प्रदीप दिघोरे, पुरुषोल्लाम हरकांडे, विनोद दिघोरे, विक्की खोब्रागडे, कृनाल नागपूरे, शामकला निमकर, ज्ञानेश्वर भोतमांगे, विजेंद्र पाटील, विक्की पानसे, चंद्रकला निमकर, संजय कामथे आदींनी नगरपालिकेचे मुख्याधिकाºयांना निवेदन देऊन संबंधित विभागाच्या अधिकाºयांना तातडीने निर्देश देण्याची मागणी केली आहे.