कन्नमवार विचाराची ज्योत राज्यभर पेटवा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : बहुजन नायक, स्वातंत्र्य संग्राम सैनिक व माजी मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या विचारकार्याची ज्योत राज्यभर प्रज्वलित करा, असे आवाहन ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक लिलाताई चितळे यांनी केले. दादासाहेब कन्नमवार यांची १२५ वी जयंती नागपूर विधानभवन प्रांगणात शुक्रवारी (ता. १०) उत्साहात साजरी करण्यात आली. बेलदार समाज संघर्ष समिती व कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार प्रसार समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक लिलाताई चितळे उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे, अधिक्षक अभियंता श्री अभिजीत कुचेवार, श्री अण्णाजी गुंडलवार, श्री उल्हास जंगीटवार, श्री शरदचंद्र रेड्डीवार, डॉ राहूल कन्नमवार, विधानसभा सहसचिव श्री विकास पाजारे, बेलदार समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र बढिये, वैशाली कन्नमवार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व कन्नमवार प्रेमींच्या उपस्थितीत विधानभवन प्रांगणात असलेल्या दादासाहेब कन्नमवार यांच्या पुणार्कृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

*या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कन्नमवार दिनदर्शिका २०२५ चे विमोचन करण्यात आले. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवा निमित्त दादासाहेब कन्नमवार यांनी लिहिलेल्या “विनोद प्रिय गांधीजी, भारताचा थोर भिक्षेकरी गांधी, मुलांचे गांधी, स्त्रियांचे गांधी” या चार पुस्तकांचे पुर्नप्रकाशन करुन अनावरण करण्यात आले. या माध्यमातून आजपासून १२५ व्या जयंतीनिमित्त सर्व बहुजन समाज बांधव व सर्वसामान्यांना पर्यंत कन्नमवार पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बेलदार समाज संघर्ष समितीच्या वतीने श्री राजेंद्र बढिये यांनी सांगितले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री खिमेश बढिये यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मुकुंद अडेवार यांनी तर आभार श्री दिनेश गेटमे यांनी मानले. बेलदार समाज संघर्ष समिती व कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार प्रसार समिती यांच्यासह संघर्ष वाहिनी, विमुक्त घुमन्तु जनजाती विकास परिषद (अ.भा.) तांडा सुधार समिती, वसंतराव नाईक कर्मचारी संघटना,भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था विमुक्त भटक्या जमाती संविधानिक हक्क संरक्षण महासंघ,कन्नमवार प्रेमी, भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *