६८ औषधी दुकानांचे परवाने निलंबीत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परीषद कक्षात नुकतीच जिल्हा ग्राहक संरक्षण परीषदेची सभा घेण्यात आली. या सभेला जिल्हा ग्राहक संरक्षण परीषदेचे शासकिय सदस्य सर्वश्री सतीश म. जाधव सहाय्यक प्रादेशिक परीवहन अधिकारी, राम परडकर अतिरीक्त कायार्कारी अभियंता महावितरण ,लक्ष्मीकांत मुसळे प्रभारी उपनियंत्रक वजन मापे शाखा, युवराज दहातोंडे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन भंडारा, मोनिका वि. धवड, प्रभारी सहाय्यक आयुक्त व औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन, एम.आर.वाढई वरीष्ठ लिपीक सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग-२ कार्यालय भंडारा, विजय जाधव जिल्हा माहिती कार्यालय प्रतिनिधी,सुहास टोंग खरेदी धान्य खरेदी अधिकारी जिल्हा पुरवठा कार्यालय इत्यादी तसेच अशासकिय सदस्य सर्वश्री प्रेमराज मोहोकार, धनंजय मुलकलवार, अनिल शेन्डे, रविंद्र तायडे, चंद्रशेखर साठे, संजय आयलवार, हेमंत साकुरे, डॉ.प्रा.अनिता महाजन, डाँ जयश्री सातोकर,डी. एफ कोचे, गॅस एंजन्सीचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते. जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी उपस्थितांचे स्वागत करुन सभेला सुरवात केली. सदर सभेत विविध ग्राहकांच्या समस्येवर सांगोपांग चर्चा करण्यात आली.

प्रामुख्याने १६ वर्षाखालील मुले वाहन चालवितात. त्यांच्यावर फक्त चलन न करता काही दिवस शिकवणी वर्गात त्यांचे प्रबोधन करुन कायदयाचे धाक दाखविण्याच्या सुचना अशासकिय सदस्यांनी दिल्या तसेच शिकवणी वर्गतील शिक्षक, तसेच शाळेतील शिक्षक व शहर वाहतुक पोलीस यांची संयुक्त सभा घेवुन मार्गदर्शन करावे तसेच पथनाटयाव्दारे प्रबोधन करावे. तसेच वाहतुक नियमांचा प्रचार व प्रसिध्दी करण्याकरीता महत्त्वाच्या चौकामध्ये बॅनर लावण्यात यावे,अश्या सुचना देण्यात आल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ, भंडारा तर्फे घरोघरी सोलर लावण्याबाबत प्रोत्साहन देण्यात येते परंतु ३ ते ४ माहिने बिल दिले जात नाही व सबसिडी मिळण्यास उशीर होते त्याबाबत अतिरीक्त कार्यकारी अभियंता महावितरण यांनी पुवीर्चा माहिती अपलोड करणे शिल्लक आहे. यावर त्वरीत माहिती अपलोड करुन ग्राहकांना सबसिडी लवकर देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले.

अन्न व औषध प्रशासनामार्फत जिल्हयामध्ये ६८ औषधी दुकाने (फार्मसी)परवाने निलंबीत करण्यात आले. व ३ परवाने रद्द करण्यात आले, असे श्रीमती मोनिका धवड यांनी सांगितले. आजची पिढी फार मोठया प्रमाणात अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेली आहे त्यावर ठोस प्रतिबंधात्मक कारवाई पोलीस विभाग व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तरित्या करावे असे सांगितले देण्यात आले. विविध फुड पॅकेट वर एक्सपायरीची तारीख लिहलेली नसते अन्न व औषध प्रशासनाकडे पुरेशे कर्मचारी नसल्याने कारवाई चे प्रमाण कमी आहे. वजन व मापे यांच्याकडुन विविध प्रकारच्या कारवाई करण्यात येत असल्याचे विभागांनी सांगितले .सभेच्या शेवटी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी ग्राहक विषयक समस्याबाबत तक्रारी जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या ईमेल वर करण्यात याव्यात,असे सांगितले व उपस्थितांचे आभार व्यक्त केले

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *