आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा! हे शब्द धिरज शिवणकर यांच्या जीवनात अगदी तंतोतंत लागू पडतात. धिरजच्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे की स्वप्नांची उंची परिस्थितीवर अवलंबून नसते; ती ठरवतात जिद्दआणि अथक मेहनत.
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पिंपळगाव (सडक) या छोट्याशा गावातील धिरज प्रविंदा परसराम शिवणकर याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत थेट भारतीय अंतराळ संशोधन संस्था (करफड) मध्ये तंत्रज्ञ म्हणून यशस्वी झेप घेतली आहे. शेतकरी कुटुंबातील मुलगा असूनही, धिरजच्या आई-वडिलांनी शिक्षणाला नेहमीच प्राधान्य दिले. शेतकरी कुटुंबातील आर्थिक आव्हाने असूनही धिरजच्या आई-वडिलांनी कधीच त्याच्या शिक्षणासाठी कसर सोडली नाही. त्यांच्या मेहनतीला धिरजनेही मेहनतीची साथ दिली आणि अखेर त्याने आपल्या स्वप्नांना गगनभरारी दिली.
विज्ञानाची आवड आणि प्रयोगशील वृत्ती: धिरजला लहानपणापासूनचविज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्सची प्रचंड आवड होती. लहान वयातच त्याने अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग केले. इलेक्ट्रिक गॅस शेगडी, आॅटोमॅटिक हॅण्ड सॅनिटायझर, आणि फ्लॉवर ड्रॉपिंग ड्रोन ही त्याची लहान वयातील काही महत्त्वाची निर्मिती होती. त्याच्या प्रयोगशीलतेचे नेहमी कौतुक करत असणारे श्री. प्रल्हादजी तरोणे यांनी त्याला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी कथांद्वारे मोठी स्वप्ने पाहण्यास प्रवृत्त केले. या प्रेरणेतूनच धिरजने शिक्षणात सातत्य ठेवले. परिस्थिती कितीही कठीण असली तरी कधीच हार मानली नाही. शिक्षणासाठी अनेक अडथळे येऊनही त्याने त्याचा प्रवास खंडित होऊ दिला नाही. अखेरीस त्याची निवड करफड मध्ये तंत्रज्ञ या प्रतिष्ठित पदावर झाली. पिंपळगावसारख्या छोट्या गावातून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेपर्यंत पोहोचलेल्या धिरजचे यश इतरांसाठीहीप्रेरणादायी ठरले आहे.
विदर्भाचा झेंडा करफड मध्ये: धिरजच्या यशामुळे भंडारा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद क्षण निर्माण झाले आहे. विदर्भाच्या भूमीतून अंतराळ संशोधन संस्थेत पोहोचणाºया धिरजने विदर्भाचा झेंडा करफड मध्ये फडकवला आहे. धिरजच्या या यशाचे कौतुक स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर होत आहे.
प्रेरणा देणारी यशोगाथा: धिरजची ही यशोगाथा दाखवून देते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द, आणि स्वप्नांवर विश्वास असेल, तर कुठलाही पिंजरा तोडून गगनभरारी घेता येते. धिरजच्या या यशाने त्याचे कुटुंबच नाही, तर संपूर्ण गाव अभिमानाने भरून गेले आहे.
“कष्ट करा, विश्वास ठेवा, आणि स्वप्नांचा पाठलाग करा,” असे धिरजचे सांगणे आहे.