भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : लहान मुले, युवक मोबाईल वर खेळ खेळत आहे. मात्र मुलांनी , युवक युवतींनी आता मैदानात येऊन खेळणे आवश्यक असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेवर आधारित खासदार क्रिडा महोत्सवाचा सातव्या पवार्चे नागपूरातील यशवंत स्टेडियम येथे थाटात उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी, ते बोलत होते. यावेळी, नितीन गडकरी आणि कंगना राणावत यांनी मॅरेथॉन व युवा दौड ला हिरवी झेंडी दाखवून खासदार क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन केले. या मॅरेथॉन व युवा दौड मध्ये हजारो युवक, युवती, नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री व खासदार कंगना राणावत यांच्यासह क्रिडा क्षेत्रातील अनेक मान्यवर व हजारो खेळाडू उपस्थित होते.
नागपुरात क्रिडा संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न केले जात असून, नागपुर शहरात ३५० मैदान खेळण्यासाठी तयार करायचे आहे.तसेच खासदार क्रिडा महोत्सवात यंदा सर्व रेकॉर्ड तोडून तब्बल ८० हजार खेळाडू सहभागी होत असुन, ४ वर्ष ते ८० वर्षाच्या वयोगटातील लोक यात सहभागी होत असल्याचेही, गडकरी यांनी यावेळी सांगितले. नागपूरात खेळाला घेऊन मोठा उत्साह आणि ऊर्जा आहे. इतर शहर आणि गावांनी देखील या क्षेत्रामध्ये यायला हवं. स्वत:च्या आरोग्याला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ही जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे.. यात मी देखील सहभागी झाले याचा मला आनंद आहे.असे मत प्रसिद्ध अभिनेत्री व खासदार कंगना राणावत यांनी व्यक्त केले.