भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा बघेडा : लेंडेझरी रोंगा मार्गावर अवैधरित्या रेतीची वाहतुक करणाºया तीन टिप्परवर गोबरवाही पोलीसांनी कारवाई करीत १ कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. मागील काही दिवसापासून बावनथडीनदी पात्रातून पोलीस स्टेशन गोबरवाही हद्दीत अवैधरित्या वाळू तस्करी होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना मिळाली त्यांच्या आदेशान्वये गोबरवाहीपोलीस चे ठाणेदार शरद शेवाळे पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गीते पोलिस ह.वा मडावी यांनी पाळत ठेवली सकाळी चार वाजता सुमारास अवैधरीत्या रेतीचे तीन टिप्पर लेंडेझरी रोंगा मार्गाने मिळून आल्याने टिपर क्रमांक एम एच ३१ एफसी ८३६०, एम एच ४० सिटी २३५७ व एम एच ४०/ ६२२१ व त्याचे चालक सागर रमेश मेश्राम व २४ वर्ष राकन्हान शिवकुमार बाळकृष्ण कोडापे वय ३७ वर्ष राहणार नरखेड उमेश चौरे वय ४७ रा. खापरखेडा यांना तब्यात घेऊन त्यांच्यावर अपक्रं११ /२००५ कलम ३०३(२) द सहकला ४८/ ८ जमीन महसूल अधिनियम सह कलम ७ ,९ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये कारवाई केली या गुन्ह्यात वाहनाचे मालकाचे सहभाग असल्याने नामे मोहम्मद हुसेन वय २४वर्ष रा नागपूर आशिष मूलचंद गौर वय २७ रा. सावनेर संजय सिताराम लांजेवार वय ३० रा.खापरखेडा यांना आरोपी करून ताब्यात घेण्यात अटक केली आहे आणि तिन्ही ट्रक गर्रा बघेडा येथील पोलीस चौकीत जमा करण्यात आले आहे,या अवैध तस्करीमध्ये कोणाचा सहभाग आहे किंवा कसे याबाबत मा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन मा अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी पी. बी गोपने ठाणेदार शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गीते व पोलीस हवालदार गायधने करीत आहेत.
अवैध रेती वाहतुकीचे तीन टिप्पर पकडले
