भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : -एचएमपीव्ही आजाराबाबत दक्ष राहून त्याबाबत आरोग्य यंत्रणेने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते यांनी दिले.नुकताच आरोग्य यंत्रणांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा नियामक समितीची सभा जिल्हाधिकारी परिषद कक्षात आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये नियमित लसीकरण,राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम, गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवड- ीस प्रतिबंध कायदा), राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मूलन मोहीम, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहीम, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समिती, जिल्हास्तरीय रोग सर्वेक्षण समिती, जिल्हास्तरीय टास्कफोर्स समिती, जिल्हास्तरीय प्राणिजन्य आजार समिती, जननीसुरक्षा योजने अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यप्रणाली समिती, सिकलसेल, मोबाईल मेडिकल युनिट, टेलिमेडिसिन, ई- संजीवनी ओपीडी, विशेष नवजात शिशु देखभाल (रठउव), पोषण पुनर्वसन केंद्र (ठफउ), राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (फइरङ),आयुष, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, एनक्यूएएस कायाकल्प या सह सर्व आरोग्य विषयक कार्यक्रमाचा आढावा घेऊन डॉ. संजय कोलते जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
यासर्व निर्देशांंकानुसार शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचून दर्जेदार आरोग्य सेवा जनतेला देण्यात याव्यात. तसेच एचएमपीव्ही या आजाराविषयी उपाययोजना करून व राज्यस्तरीय मार्गदर्शक सूचना अंमलात आणून जनतेच्या मनातील भीती दूर करावी अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. यावेळी बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुंवर, डॉ जिल्हा शल्यचिकित्सक दीपचंद सोयाम,अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयाचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील मेडिकल असोसिएशन चे प्रतिनिधी, प्रक्लप अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास अभिकरण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बाल कल्याण, जिल्हा माहिती अधिकारी, कार्यालयाचे प्रतिनिधी, विजय जाधव, शिक्षण अधिकारी (प्राथमिक /माध्यमिक), जिल्हा समाज कल्याण अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय/ ग्रामीण रुग्णालय सर्व,जिल्हा आरोग्य विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियान सर्व कार्यक्रम प्रमुख यांची उपस्थिती होती.