भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया शहर पोलीस ठाणे हद्दीतुन मागील ०३ महिन्यात वेगवेगळया ठिकाणाहुन वेगवेगळे कंपनीचे ीन्डमोबाईल हँडसेट हरविल्याच्या तक्रारी गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे प्राप्त झालेल्या होत्या. सदर तक्रारीचे गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील ठाणेदार किशोर पर्वते यांनी दखल घेवूत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांना मार्गदर्शन करुन हरविलेल्या मोबाईलचे शास्त्रोक्त पध्दतीने शोध घेतले. त्याअनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार अशोक रहांगडाले, कुणाल बारेवार यांनी हरविलेल्या मोबाईलचे केंद्र शासनाच्या सेंट्रल इक्विपमेंट आइडेंटिटी रजिस्टर (उएकफ) या अप्लीकेशन वर हरविलेले मोबाईल चे अर्ज अपलोड करुन पथकाने गोंदिया शहर पोलीस ठाणे हद्दीतुन हरविलेले किंमती २ लाख ४६ हजार रुपये चे एकुण ४१ मोबाईल बुध्दीकौशल्याचा वापर करुन अती परिश्रमाने शोधुन काढले. सदरचे मोबाईल मकर संक्रातीच्या गोड मुहुर्तावर दि. १३/०१/२०२५ रोजी श्रीमती रोहीणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया व गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील श्री. किशोर पर्वते, पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते त्यांच्या मालकांना परत करण्यात आले.
मोबाईल मालकांना त्यांचे हरविलेले मोबाईल त्यांच्या हाती परत येताच त्यांच्या चेहºयावरील आनंद व्दिगुणीत होवून समाधान दिसत होते. पोलीसांच्या या स्तुत्य कामगीरीचे सगळीकडेच कौतुक होत आहे. सदरची उल्लेखनीय कामगीरी गोरख भामरे पोलीस अधिक्षक,नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती रोहीणी बानकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक किशोर पर्वते, डी.बी. पथकाचे पो. हवा. जागेश्वर उईके, कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, निशिकांत लोंदासे, दिपक रहांगडाले, प्रमोद चव्हाण, पोशि-अशोक राहांगडाले, दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, मुकेश रावते, कुणाल बारेवार, प्रमोद शेंडे, सोनु नागपुरे तसेच सायबर सेल येथील मारवाडे, रहिले, येरणे यांनी केली आहे.