अखेर ग्रामपंचायत बपेराचे सरपंच पायउतार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : पंचायत समिती तुमसर अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत बपेरा (सि) चे सरपंच यादवराव बोरकर हे अखेर अतिक्रमण प्रकरणात पायउतार झाले असल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे. यादवराव बोरकर यांची अपील खारीज करून जिल्हाधिकारी यांनी दिलेला ५ मार्च २०२४ चा आदेश नागपूरच्या अप्पर आयुक्तांनी कायम ठेवून ग्रामपंचायत बपेराचे सरपंच यादवराव बोरकर यांना पदमुक्तचे आदेश पारित केले आहे. यात बपेरा गावाचे राजकारण चांगलेच तापू लागले आहे. बपेरा येथील गट क्रमांक ५५६ मधील आठवडी बाजाराची जागा झुडपी जंगलाकरिता नोंद करण्यात आली आहे. याच गटातील ६०० चौरस फूट जागेत ग्रामपंचायत सरपंच यादवराव लालाजी बोरकर यांनी घराचे पक्के बांधकाम केले आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यामुळे सरपंच यादवराव बोरकर यांना सरपंच पदावरून पदमुक्त करण्यासाठी गावातीलच व्यंकट राऊत यांनी जिल्हाधिकाºयाकडे प्रकरण दाखल केले होते.

या प्रकरणाची सुनावणी सुरू असतांनाच संबंधित प्रकरणाचे सर्व पुरावे तपासल्या गेले व चौकशी अंति जिल्हाधिकाºयांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (३) नुसार सरपंच यादवराव बोरकर यांना पदमुक्त करण्यात येत असल्याचा निर्णय ५ मार्च २०२४ रोजी दिला होता. सदर निर्णयाला आव्हान देणारी याचिका सरपंच यादवराव बोरकर यांनी अप्पर आयुक्त नागपूर यांच्या दालनात दाखल केली होती. अप्पर आयुक्तांनी सुनावणी घेत जिल्हाधिकारी यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला व अपिलार्थी यादवराव बोरकर यांची अपील फेटाळण्यात आली. आणि सरपंच पदावरून पदमुक्त करण्यात येत असल्याचा निर्णय अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे चवरे यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी आणि अपर आयुक्त यांनी दिलेल्या निर्णयाने सरपंच बोरकर आता पदमुक्त झाले आहेत.

बपेरा येथील वाढत्या अतिक्रमणाने वाढविली चिंता बाजार चौक परिसर आठवडी बाजारासाठी राखीव करण्यात आला आहे. झुडपी जंगल अशी नोंद असणाºया बाजार चौकाचे शेजारी आंग्ल दवाखाना व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. शिल्लक आणि उर्वरित जागेत दुकान आणि घराचे बांधकाम करण्यात आले आहे. याच जागेत सरपंच बोरकर यांनी घर आणि किराणा दुकान थाटले आहे आणि हेच अतिक्रमण त्यांना भोवले आहे. अतिक्रमणाचा मुद्दा सरपंचाला भोवल्यानंतर आता सरपंच पद रिक्त झाले आहे. आयुक्तांच्या निर्णयानंतर आता गावातील राजकारण तापले आहे. निवडणुक होणार की, न्यायालयाचे दार ठोठावले जाणार ही चर्चा चांगलीच जोर धरू लागली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *