भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : वनपरिक्षेत्रातील दासगाव येथील कक्ष क्रमांक १०२० राखीव वनामध्ये एक निम्न वयस्क नर वाघ १४ जानेवारी रोजी मृतावस्थेत आढळला. फुμफुसात संसर्गाने वाघाचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष पशुवैकीय अधिकाºयांच्या चमूने वर्तविला आहे. असे असलेतरी मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल. वाघाच्या मृत्यू प्रकरणी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण दिल्लीकडून निर्गमीत नियमावलीनुसार शव विच्छेदन व पुढील आवश्यक कार्यवाह- ीकरीता उपवनसंरक्षक वनविभाग स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे.
उपवनसंरक्षक पंचभाई यांच्या नेतृत्वात समिती सदस्यांनी वाघाच्या मृत्यूस्थळी भेट देत घटनास्थळाचे निरीक्षण केले. निरीक्षणानंतर उत्तरीय तपासणीसाठी शव कुडवा येथील वनउद्यान येथे हलविण्यात आले. मृत वाघाची ओळख कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्रावरुन करण्यात आली. मृत वाघ नवेगाव नागझिरा व्याघ्र क्षेत्रातील टी १४ वाघिणीचा नर बछडा असल्याचे स्पष्ट झाले. उत्तरीय तपासणीनंतर आवश्यक अवयवाचे नमुने न्यायवेधक प्रयोगशाळा नागपूर, पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर व वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र गोरेवाडा येथे पाठविण्यात आले. वाघाचा मृत्यू दीर्घ आजार व फुμफुसात संसर्गाने झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुचिकित्सकांनी वर्तविला आहे. वाघाच्या मृत्यु प्रकरणी वनगुन्हा जारी करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू व कॅम्पा) गोंदिया आणि वनपरीक्षेत्र अधिकारी करीत आहेत.