अवैध वाळू वाहतुकदारांवर धडक कार्यवाही सात आरोपींसह १७.५२ लाखांचा माल जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी आमगाव : तालुक्यात वाळू घाटांचा लिलाव झाला नसताना मोठ्या प्रमाणात वाळूसह इतर गौण खनिजाचे उत्खनन करून वाहतुक होत असून वाहतुकदारांवर पोलिस, महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरूवार १६ रोजी घाटटेमनी बीट, मानेकसा जंगल परिसरात पोलिसानी कलेल्या धडक कारवाईत दोन ट्रॅक्टरट्रॉलीसह १७ लाख ५२ हजार रुपये किमतीचा माल जप्त करून सात आरोपींना ताब्यात घेतले. तालुक्यातील वाघनदी घाटातून वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसाना मिळाली. माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी मानेकसा जंगल परिसरात वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई केली. कारवाईत क्रमांक नसलेला एक ट्रॅक्टर व ट्रॉली, ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५ जी ६१२४, १२०० रुपये किमतीची दोन ब्रास वाळू, असा १७ लाख ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

याप्रकरणी विनोद सुखदेव शेंडे (४०, रा. भोसा), चंद्रप्रकाश रामा कांबळे (२५, रा. बोदा), दिनेश मंसाराम चक्रवर्ती (३३, रा. टेकरी), घनश्याम टेनलाल वाढीवा (३३, रा. बंजारीटोला), मयुर मारोती मानकर (३०, रा. टाकरी), रविकांत गणेश उईके (२३, रा. टेकरी), शिलचंद माधवराव शेंडे (२५, रा. बंजारीटोला) सात जणांना ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपींविरुद्ध आमगाव पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेचे कलम ३०३ (२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या नेतृत्वात पथकातील पोलिस हवालदार मेश्राम, विनोद उपराडे, चेतन शेंडे, भागवत कोडापे, दिनेश वानखडे यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *