भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा:- बावणे कुणबी समाज सेवा मंडळ, धामणगाव रेल्वे, हिंगणगाव जि. अमरावती येथील तालुक्याच्या वतीने, सर्व शाखेतील समाज बांधवांच्या सहकार्याने दि.१८ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय युवा दिन आणि हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला. बावणे कुणबी समाज सेवा मंडळ धामनगाव रेल्वे, हिंगणगाव जि.अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्व शाखा द्वारे आयोजित कार्यक्रमात परिसरातील समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय युवा दिनानिमित्य रक्तदान शिबीराचे तसेच मकर संक्राती निमित्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात होते. सर्व प्रथम जगतगुरु संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटक बावणे कुणबी समाज युवा समिती भंडाराचे अध्यक्ष तथा भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांचे विश्वासु उमेश मोहतुरे यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उमेश मोहतुरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले की, जगतगुरू संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांचे विचार आत्मसात करा, आपल्या सर्व युवा पिढीला गरज आहे.
उद्याचे भविष्य आपल्या हातात आहे. समाज बांधवांनो एकत्रित या, संघटित राहा, जागृत राहा, समाजाप्रती आपुलकी दाखवा, एकमेकांना सहकार्य करा, आत्मविश्वास अंगी बाळगा, जगतगुरु संत तुकाराम महाराज हे सर्व समाजाचे आहेत हे विस- रता कामा नये, संत आणि महापुरुष यांच्या विचाराने प्रेरीत व्हा! कुणबी समाजाने एक संघटित राहून संत तुकाराम महाराज यांचे विचार पुढे नेण्याची नितांत गरज असल्याचे सांगीतले. याप्रसंगी वयोवृद्धांचा सत्कार करण्यात आला. स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा भेट दिली, तर बावणे कुणबी समाज सेवा मंडळ जि.अमरावती येथील समाज बांधवांच्या वतीने भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ. प्रशांत पडोळे अनुपस्थित असल्यामुळे त्यांचे विश्वासू उमेश मोहतुरे बावणे कुणबी समाज युवा समिती अध्यक्ष भंडारा यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
समाज बांधवानी रक्तदान केले. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन भंडारा बावणे कुणबी समाज युवा समिती अध्यक्ष उमेश मोहतुरे यांच्या हस्ते आशिष बांते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन अमोल सार्वे यवतमाळ, अनंतराव कडव यवतमाळ, ज्ञानेश्वर अतकरी, हेमंत बोन्द्रे, विष्णुपंत कांबे, शरदजी सार्वे, भाऊसाहेब बांडेबुचे, भानुदास बांडेबुचे, अण्णाजी शेंडे, सागर गाढवे, मनोज तुमसरे, उमेश हलमारे, दिपकराव शेंडे, माधुरी गाढवे,संगीता सेलोकर, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उमेश हलमारे यांनी केले तर सूत्रसंचालन आदिती चामट, वैशाली ठवकर यांनी केले. कार्यक्रमाला अमरावती, यवतमाळ, धामणगाव रेल्वे, हिंगणगाव परिसरातील बावणे कुणबी समाज सेवा मंडळ धामणगाव रेल्वे, हिंगनगाव जि.अमरावती येथील समाज बांधव, युवक, युवती, मोठया संख्येने सहभागी झाले होते.