भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय नागपूर यांचे दिनांक १६/०१/२०२५ चे पत्राच्या अनुषंगाने प्रत्यक्षात आणि पत्रात किती ताफावती आढळून आले ह्या महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक संगीता माने यांच्या निदर्शनास आणून देण्यात येते की ज्यावेळी मौकास्थळी नमुने संकलित करण्यात आले होते त्यावेळी, संबंधित प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे पाण्याची घाण वास येत असल्याने नाकाला कापड बांधून नमुने संकलित करीत होते.,सदर नमुने घेत असताना स्पष्टपणे व्हिडिओ चित्रीकरणामध्ये संकलित नमुनाचे रंग हा पांढरा नसून, गढूळ पण नसून पिवळा आणि स्पष्टपणे लालसर दिसून येत होता. ,त्या ठिकाणी संबंधित उद्योग पेढीच्या प्रतिनिधीने सांगितल्याप्रमाणे जाणीवपूर्वक नाही अनावधानाने पाणी सोडण्यात गेलेला आहे हे त्यांनी स्वत: मान्य केलेले आहेत, ,सदर ठिकाणी नमुना संकलित केल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी मीडिया प्रतिनिधीला प्रतिक्रिया देताना या अगोदर सुद्धा असे जल प्रदूषण करण्याचे कार्य कंपनीने केले असल्याने त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांची बँक हमी दोनदा जप्त करण्यात आले असून दंडाची कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
यावरून सदर कंपनीकडून वारंवार जाणीवपूर्वक प्रदूषित सांडपाणी शेतकºयांच्या सुपीक जमीनीमध्ये सोडण्यात येत असल्याचे दिसून येते. असे मौक्यावरील पुरावे असताना सदर उद्योग पेढीला वाचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाकडून नेहमीच मदत होत असल्याचे दिसून येत आहे. सदर पत्राद्वारे दुसºया उद्योग पेढीच्या प्रदूषित पाणी सोडण्यात आले असल्याचे दाखवण्यात आले जेव्हा की त्यांच्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही यावरून स्पष्टपणे दिसते की सदर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी क्लेरियन कंपनी उद्योग पेढीला प्रदूषणाचे कारणावरून वाचवण्याचा स्पष्टपणे प्रयत्न करीत आहेत. प्रत्यक्ष नमुना संकलन करताना तक्रार करते व सोबत शेतकरी उपस्थित असल्याने प्रत्यक्षात केलेली तक्रार खरी असल्याचे अधिकाºयासमक्ष नमुने संकलन करताना दिसून आले तसेच या प्रकरणाचे तत्कालीन मौकाचौकशीचे व्हिडिओ आणि ॠढर द्वारे फोटो घेतले असल्याने केलेली तक्रार ही खरी आहे असे सदर व्हिडिओमधून वस्तुस्थिती दिसून येते.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने लेखी पत्रावर क्लेरियन कारखान्याला स्पष्टपणे क्लीनचीट दिली असल्याचे दिसून येते यावरून ही एकतर्फी आणि त्या पीडित शेतकºयांवर अन्याय करणारी कारवाई झाली असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे सदर कंपनीची पर्यावरण विभागाच्या तज्ञ अधिकाºयांकडून फेर मौकाचौकशी करून संबंधित दोषी चुकीच्या रिपोर्ट देणाºया अधिकाºयांवर बडतर्फची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख अमित एच मेश्राम, शाखा प्रमुख मिलिंद मदनकर, शेतकरी अरुण मुटकुरे, विशाल बिरणवारे, रतीराम बशीने, संदीप वाट, बळीराम बिरणवारे, श्रीराम फेंडर, प्रफुल बिरणवारे, राजू ठाकूर, देविशंकर बिरणवारे, योगेश चिंधालोरे, प्रदीप बशीने, राज बिरणवारे यासह शेतकरी उपस्थित होते.