भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : पंचायत समिती तिरोडाचे सभापती उपसभापती ची निवड आज सोमवार दिनांक २० जानेवारी रोजी पंचायत समिती तिरोडाचे सभागृह पिठाची अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड तहसीलदार नारायण ठाकरे, सतीश लील्हारे यांचे उपस्थितीत संपन्न झाली.
तिरोडा पंचायत समितीत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट तीन, काँग्रेस एक व प्रहार जनशक्ती पक्ष एकअसे बलाबल असून भारतीय जनता पक्षाचे मागील कार्यकाळातही सभापती उपसभापती होते. याही वेळीसभापती म्हणून भाजपचे वडेगाव क्षेत्राचे सदस्य तेजराम चव्हाण व उपसभापती म्हणून चिरेखनी क्षेत्राच्या सौ. सुनंदा आनंद पटले, यांचे एक एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठाचे अधिकारी पूजा गायकवाड यांनी जाहीर केले. यामुळे याही वेळी भाजपने आपला गड कायम राखल्याने सभापती उपसभापती निवड झालेले सदस्यांचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.