सात पंचायत समितीमध्ये भाजपचा राज

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील आठ पंचायत समिती सभापती निवडणूक आज पार पडली. ८ पंचायत समिती पैकी सात पंचायत समिती मध्ये भाजप चे सभापती तर एक पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या सभापती विराजमान झाले. यामध्ये गोंदिया येथे पंचायत समितीच्या सभापतीपदी मुनेश्वर रहांगडाले, उपसभापती शिवलाल जमरे, गोरेगाव पंचायत समिती सभापतीपदी चित्रकला चौधरी यांची निवड, देवरी पंचायत समितीच्या सभापतीपदी अनिल बिसेन तर उपसभापती पदी सालीकराम गुरनुले, सडक अर्जुनी पंचायत समितीच्या सभापतीपदी चेतन वाळगाय तर उपसभापती निशा काशीवार, तिरोडापंचायत समितीच्या सभापतीपदी तेजराम चव्हाण तर उपसभापती सुनंदा पटले, आमगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी योगिता पुंडे तर उपसभापती सुनंदा उके, अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी आम्रपाली डोंगरवार तर उपसभापती संदीप कापगते आणि सालेकसा पंचायत समितीच्या काँग्रेसचे सभासपती पदी विनाताई कटरे तर उपसभापती जितेंद्र बल्लारे यांची निवड झालेली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *