भाजपचे सर्वात जास्त सभापती व उपसभापती

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आज जिल्ह्यात पार पडलेल्या पंचायत समिती सभापती/उपसभापती निवडणूकीत महायुतीला आ. परिणय फुके व आ. राजु कारेमोरे यांच्या नेतृत्वात भरघोष यश मिळाले आहे. भाजपचे ३ सभापती व ३ उपसभापती निवडणून आले तर राष्ट्रवादीचा १ सभापती व २ उपसभापती निवडून आले. अशा प्रकारे जिल्ह्यातील सात पंचायात समितीमध्ये महायुतीचे ४ सभापती तर ५ उपसभापती निवडून आले. भंडारा पंचायत समितीत भाजपच्या श्रीमती कल्पना इंद्रजित कुर्झेकर, मोहाडी पं.स. मध्ये जगदिश शेंडे व लाखांदूर पं.स.मध्ये पुरुषोत्तम ठाकरे या भाजपच्या सभापतीची निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रसच्या पं.स. तुमसरच्या श्रीमती दिपा गौपाले सभापती म्हणून निवडून आल्या. भाजपचे सुभाष बोरकर तुमसर पं.स, देवा चकोले मोहाडी पं.स, व प्रमोद मेंढे पं.स. पवनी यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे नागेश भगत, पं.स. भंडाराचे श्रीमती सुष्मीता वरखडे, पं.स लाखांदूर यांची उपसभापती पदी निवड करण्यात आली. महायुतीतील या यशाबद्दल सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे व निवडणून आलेल्या सभापती व उपसभापतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *