मानवी जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व- जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : महसुल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. या विभागात काम करतांना अनेक घडामोडींना सामोरे जावे लागते. कामाच्या वाढत्या ताणतणावामुळे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. खेळाच्या माध्यमातून मानसिक व शारिरीक आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत होते. अशाप्रकारच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमुळे अधिकारी व कर्मचारी यांच्यात लपलेले सुप्त गुण या माध्यमातून समोर येतात. क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा खेळाडू व कलाकारांसाठी एक व्यासपीठ आहे जिथे आपल्या कलागुणांना चालना मिळते. त्यामुळे मानवी जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेवून विजय मिळवावा, त्यासोबतच विभागीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्ह्याचे नाव लौकीक करावे असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले. दिनांक २१ ते २३ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना आज जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे प्रारंभ झाला, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी क्रीडाज्योत व दीप प्रज्वलित करुन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर यांचेसह सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, मानवाने जीवनात सुदृढ, निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी तसेच शारिरीक व मानसिक आरोग्यासाठी नियमितपणे खेळणे व व्यायाम करणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येकाने खेळासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. खेळ व व्यायाम यांच्या अभावामुळे कमी वयातच व्यक्ती अनेक रोगांना बळी पडत आहेत, म्हणून खेळकडे वळा. दिवसातील अर्धा, एकतास खेळासाठी द्या असा संदेश देवून ते पुढे म्हणाले, शारिरीक सुदृढतेसोबतच मानसिकदृष्ट्या सुध्दा सुदृढ राहण्यासाठी महसूल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. स्पर्धकांनी खेळाडूवृत्ती जोपासून खेळ खेळावे. खेळाच्या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवावे. सर्व खेळांचा आनंद घ्यावा व मित्रत्वाचे संबंध टिकवूनठेवावे. स्पर्धकांनी खेळामध्ये वादावाद करु नये. पंचांनी दिलेला निर्णय मान्य करावे असे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम म्हणाले, महसूल क्रीडा स्पर्धेला एक परंपरा आहे. क्रीडा संस्कृती आपल्या जीवनात रुजविण्याची आज आवश्यकता आहे. खेळात सर्व समावेशकता असली पाहिजे.

खेळल्याने व व्यायाम केल्याने आपल्या शरिराचे स्नायु बळकट होत असतात. खेळामुळे सर्वांगीण विकास होत असतो. सर्व स्पर्धकांनी खेळ- ाडूवृत्तीने खेळ खेळावे असे त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक श्री. भामरे म्हणाले, शरीर हे क्रीडांगण आहे. आपले शरीर सुदृढ, निरोगी व परिपक्व असले पाहिजे. सुदृढ शरिरात सुदृढ मन असले पाहिजे. खेळल्याने मनुष्याचा शारिरीक व मानसिक विकास होत असतो. प्रत्येकाने रोज सकाळी खेळल्याने व व्यायाम केल्याने शरिरातील मस्तिष्क व मन संतुलीत राहते. शरिराची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. खेळल्यामुळे व व्यायाम केल्याने मुनष्य निरोगी राहतो व शरीर बळकट बनते. स्पर्धकांनी खेळ खेळतांनाआपली काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकातून निवासी उपजिल्हाधिकारी श्री. बेहेरे म्हणाले, दरवर्षी महसूल क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. खेळ हा मानवी जीवनातील एक मुलभूत अंग आहे. महसूल विभागात काम करतांना सर्वांना ताण-तणावाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी प्रत्येकाने व्यस्त कामातून खेळासाठी वेळ दिल्यास आपले आरोग्य निरोगी राहते. त्यासोबतच सांघिक भावनेने खेळ खेळावे, त्यामुळे खेळाडूवृत्ती तयार होवून कामात कितीही त्रास झाल्यास मन विचलीत होत नाही.

जीवनात मानवाचे आरोग्य सुदृढ व निरोगी ठेवण्यासाठी खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. सर्व खेळाडूंनी आनंदमय वातावरणात निखळपणे खेळावे व खेळाडूवृत्ती जोपासावी. या महसूल क्रीडा स्पर्धेत एकूण ५५० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत असे त्यांनी सांगितले. प्रारंभी मान्यवरांनी एकूण ५ उपविभागाचे पथसंचलनाचे निरीक्षण केले. पथसंचलनात एकूण ५ उपविभागापैकी जिल्हाधिकारी कार्यालय संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी तहसिलदार समशेर पठाण यांनी सर्व अधिकारी व कर्मचाºयांना खेळात वचनबध्दता, प्रतिबध्दता व खेळाडूवृत्ती जोपासण्यासाठी क्रीडा विषयक शपथ दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती मंजुश्री देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार श्रीकांत कांबळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, नाझर राकेश डोंगरे, तलाठी रियाद तुर्क यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी सर्वश्री चंद्रभान खंडाईत (गोंदिया), वरुणकुमार शहारे (अर्जुनी/मोर), पुजा गायकवाड (तिरोडा), कविता गायकवाड (देवरी), जिल्हा पुरवठा अधिकारी सतीश अगडे, तहसिलदार सर्वश्री अनिरुध्द कांबळे (अर्जुनी/मोर), मोनिका कांबळे (आमगाव), महेंद्र गणवीर (देवरी), नरसय्या कोंडागुर्ले (सालेकसा), अक्षय पोयाम (सडक/अर्जुनी), प्रज्ञा भोकरे (गोरेगाव), नारायण ठाकरे (तिरोडा), ज्येष्ठ खेळाडू मुन्नालाल यादव यांचेसह महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार आमगाव तहसिलदार मोनिका कांबळे यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *