सहाय्यक शिक्षकाची बदली केल्याने सितेपार जि. प. शाळेला गावकºयांनी ठोकले कुलूप

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले जिल्हा परिषद शाळा सितेपार येथील एका शिक्षकाची अस्थायीरीत्या जवळचे गावी बदली केल्याने सीतेपारवासीयांनी शिक्षकाची बदली रद्द करा म्हणून २० जानेवारी रोजी शाळेला कुलूप ठोकले. पंचायत समिती तिरोडा अंतर्गत सितेपार जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेतील देवगडे या शिक्षकाची तात्पुरती जवळचे लोणार गावात शिक्षक कमी असल्यामुळे बदली केल्याने सीतेपारवासीयात रोष उत्पन्न होऊन त्यांनी २० जानेवारी रोजी सकाळी शाळेचे गेटला कुलूप लावून आंदोलन सुरू केल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना शेजारचे मैदानात बसवले असल्याची माहिती तिरोडा गट शिक्षणाधिकारी विनोद चौधरी यांना मिळतात त्यांनी आपले अधिनस्तगटसमन्वयक ब्रजेश मिस्टर केंद्रप्रमुख भगत चांदेवार, कुमारी लांडगे, कुमारी पारधे यांचे सह सितेपार येथे जाऊन गावकºयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र, गावकरी आपले निर्णयावर म्हणजेच सितेपार या शाळेतून बदलीकेलेले शिक्षक देवगडे यांना परत सितेपार शाळेत आणा, यासाठी तुम्ही मदत केल्याशिवाय आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली असता गटशिक्षणाधिकारी विनोद चौधरी यांनी त्यांना यासंबंधी असलेले सर्व नियम सांगून लोणार येथे शिक्षकांची कमी असल्याने तेथील विद्यार्थ्यांची नुकसान होऊ नये म्हणून तात्पुरती शिक्षक देवगडे यांची तिथे असताही बदली करण्यात आले असून लोणार येथे व्यवस्था होताच आम्ही देवगडे यांना परत येथेच पाठवू असे सांगितले. मात्र गावकºयांनी काहीही न ऐकल्यामुळे शेवटी गट शिक्षणाधिकारी विनोद चौधरी यांनी आम्ही त्वरित तुमच्या शिक्षकाला येथे परत पाठवू असे आश्वासन दिल्यावरून शाळेचे गेटला लावलेले कुलूप उघडून विद्यार्थ्यांना शाळेत बसवण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *