भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया द्वारे हेल्मेट वाटपचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रदीप नायर यांच्या हस्ते या मोटार सायकल चालकांना हेल्मेट वाटप करण्यात आले. या मध्ये कॉलेज मधील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी तसेच सामाजिक संस्था, आॅटो चालक काळी पिवळी चालक व महिला पुरुष अश्या शेकडो मोटार सायकल चालक सहभागी झाले होते. त्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले व रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे. असे संदेश जनसामान्यांपर्यंत पोहचावे व रस्ता सुरक्षते विषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. तर गोंदिया जिल्ह्यातील वाढत असलेली वाहनसंख्या पाहता रस्ता सुरक्षतेविषयी जनजागृती व्हावी यासाठी मोटार सायकल हेल्मेट वाटप आयोजन करण्यात आले होते. गोंदियाच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले होते. हेल्मेट वाटप सुरुवात करण्यापूर्वी पुष्पा भाऊ चे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत नाट्य कला प्रदर्शीत करन्यात आले. विशेषता रस्त्यावरुन येणाºया बिना हेल्मेट वाहन चालविणाºया मोटार सायकलस्वारांना कार्यक्रमाप्रसंगी हेल्मेट वाटप करत हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच सर्व वाहन चालकांना रस्ता सुरक्षतेबाबत माहिती देण्यात आली.