भंडारा : जिल्ह्यातील शेतकºयांसाठी फॉर्मर युनिक आयडी नोंदणीचे काम सुरू होणार असून, यासाठी क्षेत्रीय स्तरावर ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक व ग्राम विकास अधिकारी नोंदणीचे काम करतील. कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकºयांना जलदगतीने सेवा देण्यासाठी युनिक आयडीचा उपयोग होणार असून यात शेतकºयांच्या नावावर शेतजमीन असेल तरच त्यांना फार्मर आयडी मिळणार आहे. त्यामुळे शेतकºयांना सेवा, सुविधा त्यातून मिळू शकतील. याद्वारे शेतकºयांसाठी अॅग्रीस्टॅक नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहे.
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार अॅग्रीस्टॅक योजनेस मान्यता देण्यात आली असुन या योजनेत राज्यातील सर्व शेतकºयांचा व त्यांचा शेतांचा आधार संलग्न माहिती संच (शेतकरी नोंदणी) तयार करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. शेतकºयांची नोंदणी करण्यासाठी ग्रामस्तरावर ही मोहीम सुरु करण्यात येणार आहे. यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक शेतकºयांच्या फार्मर युनिक आयडीच्या नोंदी घेणार आहेत. यासाठी जिल्हास्तरावरील अधिकाºयांचे प्रशिक्षण पूर्ण होणार आहे.
लवकरच तालुका पातळीवरील प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नोंदणीला सुरुवात होणार आहे. शेतकºयांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (शेतकरी नोंदणी) तयार झाल्यानंतर शेतकºयाला विविध योजनेचा लाभ, पिक विमा, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकºयांचे देय नुकसान भरपाई तसेच शेतकºयांनी कृषी कर्ज व इतर सेवा देण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. शेतकºयांना विविध योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी व शेतकºयांची ओळख पटवून देण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करण्यात आली आहे.
गावात प्रत्यक्षात नोंदणीचे काम करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक नियुक्त करण्यात आले असुन जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अमंलबजावणी समिती नियुक्त करण्यात आली असून यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी, जिल्हा लिड बँक मॅनेजर यांचा समावेश आहे. तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती असुन यामध्ये तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश आहे.