गोंदिया : गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या लगतच्या छत्तीसगड राज्यातून रेतीची अवैध वाहतूक करणाºया दोन ट्रक व एका ट्रॅक्टरवर देवरी पोलिसांनी कारवाई केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील शिरपूर चेक पोस्ट या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. छत्तीसगड राज्यातून मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यामध्ये ही रेतीची वाहतूक करण्यात येणार होती, मात्र देवरी पोलिसांनी शिरपूर चेक पोस्टवर दोन्ही ट्रकला थांबवून चौकशी केली असता त्यांच्याकडे अवैध रेती साठा असल्याचे समजले. यावरून देवरी पोलिसांनी कारवाई केली आहे. दोन्ही कारवाई मध्ये जवळपास एक लाखांपेक्षा अधिकचा रेतीसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी देवरी पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.