भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील गंगाझरि जुनेवानी येथे २१ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजता तिरोडा येथील व्यापारी गौरव निनावे आणि त्याचा मित्र आकाश नंदरधने हे त्यांचे मित्र दुष्यंत रेबे यांच्या लग्नासाठी पलाश रिसॉर्ट दांडेगाव येथे गेले होते. घनदाट जंगलातून वाटेत पलाश रिसॉर्ट आहे. आणि मधोमध एकही गाव सापडत नाही. २१ रोजी लग्न आटोपून घरी परतत असताना रात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी जुनेवानीकडे निघाली असता समोरून पल्सर वाहन दिसले. त्यावर ३ जण होते. गौरव ने त्याला रस्ता विचारला असता त्याने गाडीची काच खाली करण्यास सांगितले. त्याने काच उचलताच माकड टोप्या घातलेल्या तीन अज्ञातांनी त्याच्या कपाळावर बंदूक दाखवून बळजबरीने दरोडा टाकत असताना रिव्हॉल्व्हरमधून हवेत एक राऊंड गोळी झाडून अज्ञात आरोपींनी त्यांच्या कडून तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
यामध्ये सोन्याच्या आणि चांदी व रोख रक्कम घेऊन त्याला धमकी दिली की, जर तू पोलिसांकडे गेलास तर ते तुला घरी येऊन ठार मारतील. आणि दरोडा टाकणारा आरोपी पळून गेला. त्यानंतर गौरवने आपल्या ट्रंकमध्ये ठेवलेल्या मोबाईलवरून मित्र आणि नातेवाईकांना फोन करून गंगाझरी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या घटनेत तत्परता दाखवत तिरोडा डीएसपी साहिल झरकर आणि गंगाझरी पोलीस स्टेशनचे प्रभारी वर्मा त्यांच्या डीबी टीम स्कॉटसह तत्काळ घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहिताकलम ३०९(४) ३(५) ३५१(२), ३, २५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पोलिसांकडून कसून तपास सुरू असून आरोपींचा शोध सुरू आहे. तर एक गोळी फायर केलेल्या गोळीचा कॅप घटनास्थळावरून मिळालेला आहे.