रमाकांत खोब्रागडे तिरोडा : तिरोडा येथील शहीद मिश्रा विद्यालयाचे एनसीसी व शारीरिक शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने तसेच या शिक्षकाचा जामीन मंजूर झाल्याने तिरोडा शहरातील नागरिकांमध्ये रोष उत्पन्न झाल्याने आज दिनांक २३ रोजी पंचशील बहुउद्देशीय सेवा संस्थेद्वारे पुकारण्यात आलेल्या तिरोडा बंदला शहरातील महिला पुरुष शाळा व्यवस्थापन व व्यापारी बंधूंनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याने तिरोडा बंद यशस्वी झाला असून शाळेत अशी घटना घडली असतानाही शाळेचे स्नेहसंमेलन आयोजित केल्याने तणाव निर्माण झाला मात्र मोर्चेकरण्याचे मागणीवरून प्राचार्यांनी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम रद्द झाल्याची घोषणा केल्यावरून तणाव निवळला.
तिरोडा शहरातील नामांकित शहीद मिश्रा शाळेत दहाव्या वर्गात शिकणारे एका एनसीसी कॅडेट मुलीचा एनसीसी शिक्षकाने १६ ते १९ जानेवारी दरम्यान विनयभंग केल्याने या शिक्षकाविरुद्ध १९ तारखेचे रात्री बारा वाजता दरम्यान तिरोडा पोलीस स्टेशन येथे विनयभंग व पोस्को कलमा नुसार गुन्हा दाखल होऊन शिक्षकास मारहाण झाल्याने तिरोडा येथे प्राथमिक उपचार करून गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच गुन्हा दाखल झाल्याचे काही तासातच सदर शिक्षकांचा जामीन मंजूर झाल्याने तसेच नागरिकांनी केलेल्या मागणीवरून गोंदिया शिक्षणाधिकारी यांचे सूचनेवरून शाळेचे संस्थेचे संचालक मंडळ व मुख्याध्यापकांनी सदर शिक्षकाला निलंबित केले होते. मात्र तिरोडा शहरातील नागरिकांना या शिक्षकाचे निलंबन मागे घेण्याची अफवा पसरल्याने तिरोडा येथील पंचशील बहुउद्देशीय सेवासंस्थेद्वारे पोलीस स्टेशन तिरोडा येथे २२ तारखेचे रात्री निवेदन देऊन २३ जानेवारी रोजी तिरोडा बंदची हाक दिल्याने या संस्थेचे बंदचे हाकेला तिरोडा शहरातील हजारो महिला पुरुषांनी या मोर्चात सामील झाले. त्याचप्रमाणे अनेक संस्था चालकांनी आपल्या शाळा बंद ठेवल्या तसेच व्यापारी संघटनेनेही या बंदला पाठिंबा दिल्याने शहरातील व्यापारी प्रतिष्ठानेही बंद होती.
पंचशील बहुउद्देशीय सेवा संस्थेद्वारे आज सकाळी खैरलांजी मार्गावरील रेल्वे चौकी येथील मोर्चा निघून पोलीस स्टेशन मार्गे शहीद मिश्रा शाळे समोर पोहोचला, मात्र एका अल्पवयीन मुलीवर अन्याय होऊनही शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करून आनंद व्यक्त होत असल्याचे नागरिकांचे लक्षात आल्यावरून नागरीकांनी स्नेहसंमेलन बंद करा असा आग्रह धरला, यावरून तिरोडा पोलिसांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र मोर्चेकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने शाळेचे मुख्याध्यापक विकास बारापात्रे यांनी मोर्चेकºयांची मागणी मान्य करत हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम रद्दकरीत असल्याचे सांगितल्यावरून मोर्चेकºयांचा रोष शांत होऊन तनाव निवळला. तसेच अल्पवयीन मुलीवर झालेल्या अन्यायाचे विरोधात तिरोडा वासियांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने यापुढे अशा घटनांना आळा बसेल असे मतअनेक नागरिकांनी वर्तवले आहे.