भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील देव्हाडी येथील औषध निर्मिती करणाºया क्लेरियन कंपनीतील कामगारांनी आज सोमवारी (दि.२७) रोजी काम करताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेली साधनसामग्री पुरविण्यात यावी. सोयी, सुविधांसह वेतनवाढ करण्यात यावी, या मागण्यांच्या अनुषंगाने कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी संप पुकारून निदर्शने केली.
सदर कंपनीत बुधवारी (दि. २२) जानेवारीच्या मध्यरात्री रासायनिक पदार्थ अंगावर उडाल्याने गंभीर जखमी झालेल्या सुनील दमाहे नामक सुपरवायझरचा शनिवारी (दि.२५)उपचारादरम्यान दुपारी मृत्यू झाला. त्यामुळे कारखान्यातील कामगारांतरोष पसरला आहे. सदर कारखान्यात काम करणाºया कर्मचाºयांना सुरक्षा साधने उपलब्ध करून दिले असते, तर हा अपघात टळला असता. परंतु, कंपनीने सुरक्षा साधने दिली नसल्याने नेहमीच अपघात होतात असे कामगारांचे म्हणने आहे.