भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आयुध निर्माणी भंडारा (जवाहरनगर) येथे २४ जानेवारी रोजी झालेल्या स्फोटात ८ जणांचा मृत्यू ५ जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर तीन वरिष्ठ अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये आयुध निर्माणीचे मुख्य महाव्यवस्थापक सुनील सप्रे, महाव्यवस्थापक अनुज किशोर प्रसाद आणि ललित कुमार यांचा समावेश आहे. आयुध निर्माणीचे नवे मुख्य महाव्यवस्थापक म्हणून दीपक उद्धवराव देशमुख यांची नियुक्तीकरण्यात आली आहे. याआधी देशमुख पुणे येथे महाव्यवस्थापक पदावर होते. स्फोटाच्या घटनेच्या ४८ तासानंतर बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
आयुध निर्माणीच्या लो टेम्परेचर प्लास्टिक एक्सपोजर २३ इमारतीत शुक्रवार, २४ जानेवारी रोजी सकाळी १०.४० वाजता भीषण स्फोट झाला. या घटनेत आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर तीन वेगवेगळ्या पथकांनी तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर २६ जानेवारी रोजी आयुध निर्माणी अधिकाºयांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दीपक देशमुख यांच्याकडे तात्काळ पदाचा कार्यभार सोपवून पुण्यातील मुख्यालय गाठण्याचे आदेश भंडाºयाचे मुख्य महाव्यवस्थापक सुनील सप्रे यांना देण्यात आले आहेत. तर अनुज किशोर प्रसाद हे भंडारा येथे राहून पुणे मुख्यालयाच्या आदेशानुसार भंडारा येथील कारखान्यात काम करणार आहेत. कामाचा अहवाल पुणे मुख्यालयाला द्यावा लागणारा आहे. तर महाव्यवस्थापक ललित कुमार यांना पुणे मुख्यालयातील सुरक्षा विभागात पाठवण्यात आले आहे. स्फोटाच्या घटनेनंतरची ही पहिलीच कारवाई आहे. संरक्षण मंत्रालयाने ही स्फोटाची घटना गांभीर्याने घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.