भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : येथील जयस्तंभ चौक बसस्थानकाचे नूतनीकरण करावे, अशी मागणी जागृती विकास मंचने केली असून संघटनेच्या पदाधिकाºयांनी विधान परिषद सदस्य परिणय फुके यांना निवेदन दिले. गोंदिया शहराच्या विकास कामात प्रगती होत असतानाही शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले स्थानिक बसस्थानक आजही आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. या बसस्थानकावर दिवसभरात १०० हून अधिक बसेस थांबतात. आणि शेकडो प्रवासी येथून प्रवास करतात. सोयीसुविधांबाबत बोलायचे झाले तर, याठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, तसेच बाहेरगावातून येणाºया प्रवाश- ांसाठीही स्वच्छतागृहे नाहीत. घाण आणि कचºयामुळे प्रवाशांना तिथे उभे राहणे कठीण झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून बसची वाट पहावी लागत आहे.
जयस्तंभाच्या बसस्थानकाची पुनर्बांधणी करून सुशोभीकरण करावे, जेणेकरुन गावातून येणाºया प्रवाशांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासोबतच प्रवाशांसाठी जागृती विकास संस्था कार्यरत आहे या अनुषंगाने गेल्या दोन वर्षांपासून या विषयावर काम करणाºया संस्थेच्या अधिकाºयांनी विधान परिषद सदस्य परिणय फुके यांना निवेदन दिले. निवेदन देताना परिणय फुके यांनी जनतेच्या सोयीसाठी या प्रश्नाला प्राधान्य देऊन लवकरच अत्याधुनिक बसस्थानक बनवू, असे आश्वासन दिले यावेळी निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष पंडित सुरेंद्र शर्मा, सचिव सूरज नशीन, महिला अध्यक्षा दिव्या भगतपारधी, संघटक प्रितिश रामटेकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल जैस्वाल, आबिद शेख, चंद्रप्रकाश गुप्ता, अमित जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.