माडगी येथील पेट्रोल पंप ला लागली आग कर्मचाºयांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : रामटेक ते गोंदिया महामार्गावरील तुमसर तालुक्यातील माडगी येथील पेट्रोल पंप वरील डिझेल मशीन मध्ये आज २८ जानेवारीला दुपारी २ वाजे दरम्यान अचानक आग लागली. आग लागताच तेथील वाहनधारक व कर्मचाºयांची एकच धांदल उडाली. पंपावर आग विझवण्याकरिता ठेवलेली रेतीच्या व अग्निशामक सिलेंडरचा वापर करून कर्मचाºयांनी आग आटोक्यात आणली व मोठी हानी टळली. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे कौशल्य आॅटोमोबाईल्स राजू सेलोकर यांच्या मालकीचे माडगी येथील पेट्रोल पंपवर अचानक डीजल मशीन मध्ये आग लागली. त्यामुळे पंपावर व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

परंतु परिस्थितीची जाण ठेवत कर्मचाºयांनी आग विजविण्याकरिता पंपावर असलेल्या साहित्याच्या वापर करून आगीवर नियंत्रण ठेवले व परिसरातील जनतेने सुटकेच्या श्वास घेतला. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे मोठे अधिकारी पंपावर हजर झाले असून डिझेल मशीन मध्ये लागलेल्या आगीचे कारण शोधत आहेत. पेट्रोल पंपाचे मशीनचे व इतर बाबींचे कंपनीकडून सर्वेक्षण केले जाते. आज घडलेली घटना टळली परंतु या घटनेमागील कारण व जबाबदारी कुणाची? हा मात्र प्रश्नचिन्ह उद्भवतो.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *