भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : परीसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे ही पोलिसांची महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. हीच जबाबदारी पार पाडण्याच्या उद्देशातून प्रामाणिक आणि कर्तबगार पोलिस प्रयत्नशील असतात. अशीच कर्तव्यावर जबाबदारी पार पाडण्याकरीत प्रशासकीय बदली अंतर्गत तरुण ठाणेदार सचिन पवार यांची २६ जानेवारी २०२४ मध्ये ५ बिट मध्ये विभागलेल्या ४८ गावांची जबाबदारी असलेल्या लाखांदूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. आज त्यांच्या कार्यकाळाला वर्षपूर्ती आली असून या वर्षभराच्या कार्यकाळात त्यांनी विविध प्रकारच्या ४१४ अवैध प्रकरणी कारवाई आणि भा.न्या.सं. नुसार गुन्हे दाखल केले आहेत. प्राप्त माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यात राजकीय, सामाजिक आणि इतर बाबतीतही लाखांदूर तालुक्याचे अनन्य साधारण महत्व प्रस्थापित झाले आहे. कुठल्यातरी चर्चेच्या माध्यमातून लाखांदूर तालुका नेहमी चर्चेत असतो. याव्यतिरिक्त, अवैध धंद्यांचे माहेरघर समजल्या जाणाºया लाखांदूर तालुक्याला गतकाही वर्षात अवैध व्यवसायांना बराच अंकुश बसला आहे.
गत वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी २०२४ ला लाखांदूर पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक म्हणून सचिन पवार यांची नियुक्ती झाली. अगदी तरुण असलेले नवनियुक्त ठाणेदार पवार हे येथील अवैध व्यवसायासह इतर बळावलेल्या गुन्हेगारीला नियंत्रणात आणणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान, सचिन पवार यांनी लाखांदूर पोलिस स्टेशन चा पदभार स्वीकारताच अवैध दारू, रेती तस्करी, जुगार आणि इतर अवैध व्यवसायांना चाप दिली. धळाधळ कारवाया करीत त्यांनी अवैध व्यावसायिकांच्या मुसक्याआवळल्या. २६ जानेवारी २०२५ ला त्यांच्या कार्यकाळाला वर्षपूर्ती झाली असून जानेवारी २०२४ ते २६ जानेवारी २०२५ या वर्षभरात त्यांच्या मार्गदर्शनात लाखांदूर पोलिस स्टेशन अंतर्गत विविध अवैध प्रकारातील आणि गुन्हेगारीचे एकूण ४१४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये, जुगार, दारू, रेती, वाहन चालक, बोगस डॉक्टर, आणि इतर भा. न्या. सं. नुसार गुन्ह्यांची नोंद आहे.