११ लाखांची सुगंधीत तंबाखु व मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : स्कॉरपीओ वाहनातुन प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुची अवैद्यरित्या वाहतुक करणाºया वाहनावर दहशतवाद विरोधी शाखा, भंडारा व पो.स्टे. दिघोरी यांची संयुक्त कार्यवाही मध्ये ६ लाख १६ हजार ६५५ रुपये किमतीची प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु व रुपए ५ लाख रुपये किमतीची एम.एच.-४० ऐ/६८७९ स्कॉरपीओ वाहन असा एकुण ११ लाख १६ हजार ६५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भंडारा जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू राहणार नाही याकरिता नागरिकांनी सहाकार्य करून अवैध धंद्याची माहिती दिल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांनी भंडारा जिल्हयातील सर्व नागरिकांना केले होते. व त्यांना त्यांच्या तक्रारी देण्याकरीता प्रसारित करण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकावर माहिती देण्याचे व माहिती देणाºयाचे नाव गुप्त ठेवणार असल्याचे सांगितले होते. त्या अनुषंगाने दि. २६ जानेवारी २०२५ रोजी अशाच पध्दतीने एका सुजान नागरिकांकडुन माहिती मिळाली की, गोंदिया जिल्ह्यातुन भंडारा जिल्ल्ह्याचे पो. स्टे. दिघोरी हद्दीत एका स्कॉर्पीओ वाहनातुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेली सुगंधीत तंबाखुची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

सदर माहितीवरून पोलीस अधीक्षक, नूरुल हसन यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या दहशतवाद विरोधी शाखा, भंडारा, येथील पथकाला सदर ठिकाणी जावुन कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार दहशतवाद विरोधी शाखा, भंडारा पथकातील अधिकारी स.पो.मि. नागलोत, हे त्यांचे शाखेतील स्टॉपसह पो.स्टे. दिघोरी हद्दीत खाना होवुन पो.स्टे. दिघोरी येथील स्टॉप मदतीला घेवुन रात्री ९ वाजताच्या सुमारास दिघोरी ते पालांदूर जाणाºया रस्त्यावर चुलबंध नदीचे पुलाजवळ नाकाबंदी करून संशयीत वाहनाचे तपासणी करीत असतांना एम. एच. ४० ऐ/६८७९ स्कॉर्पीओ या वाहनास अडवुन तपासणी केली असता त्यामध्ये मिळालेल्या गोपनिय माहिती प्रमाणे वाहनाचे पाठीमागील सिट काढून त्यामध्ये पांढºया व पिवळ्या रंगाच्या बोरीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेली सुगंधीत तंबाखु आढळून आली. वाहन चालकास व त्याचेसोबत असलेल्या ईसमास त्यांचे नाव व पत्ता विचारले असता चालकाने आपले नाव भरत नरेश खापरिकर वय १९ वर्ष रा. कोंढा-कोसरा, ता. पवनी जिल्हा भंडारा, व त्याचेसोबत असलेल्या ईसमाने आपले नाव नयन राजेश नंदनवार वय २१ वर्ष रा. अड्याळ ता. पवनी असे सांगुण सदर वाहन हे अड्याळ येथील आशु शेख याचे मालकीचे असुन वाहनात असलेली सुगंधीत तंबाखु माजकाच्या सांगण्यावरून राजनांदगाव येथुन आणल्याचे सांगीतले.

सदर वाहनामध्ये मिळून आलेल्या सुगंधीत तंबाखुची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये होला हुक्का, ईगल हुक्का, मजा १०८, प्रिमीयम पान पराग मसाला असे एकुण ६ लाख १६ हजार ६५५ रुपये किमतीची प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु व ५ लाख रुपये किमतीची एम.एच.-४० ऐ/६८७९ स्कॉरपीओ वाहन असे मिळून आल्याने एकुण ११ लाख १६ हजार ६५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी राजेश बळीराम यादव अन्न व सुरक्षा अधिकारी, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून तीन्ही आरोपी विरुध्द पो.स्टे. दिघोरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी क्र. १ व २ यांना अटक करण्यात आली असुन आरोपी क्र. ३ फरार असुन त्याचा शोध सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *