यशवंत थोटे/भंडारा पत्रिका मोहाडी : आराध्य भगवान बाबा हनुमानजीच्या कृपेने व महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाने ब.उ.प.पू. परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीच्या वतीने दु:खी गरीब व अज्ञानी मानवास भगवत प्राप्तीचा परिचय करून देऊन सुखमय जीवन जगण्यास प्रेरीत करुन व वाईट व्यसन व अंधश्रद्धेपासून मुक्त करणारे मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी महानत्यागी बाबा जुमदेवजी भव्य सेवक संमेलन मोहाडीच्या मंडळातर्फे वर्षे २७ वे गुरूवार दि.३० जानेवारी २०२५ रोजी आयोजीत करण्यात आले आहे. सकाळी ९ ते १० वाजता सामुहिक हवन कार्य. सकाळी १० ते १२.३० वाजता शोभायात्रा (मिरवणूक) झाँकी सांस्कृतिक भवनातून निघेल.
दुपारी १२.३० ते १ वाजता पाहुण्यांचे स्वागत व सत्कार. यावर्षीचे गोरवपात्र सेवक खेमराज समरीत डोंगरगाव, मार्गदर्शक दुर्गाप्रसाद सुलाखे उमरी, लक्ष्मण ठोंबरे बेटाळा,नत्थु बांते गराडा तर सत्कारपात्र राजाराम मारबते, श्रीकृष्ण झंझाड, भावना परमानंद थोटे, शालू सुरेश चिंधालोरे मोहाडी यांची निवड करण्यात आली. विशेष अतिथी राज्यसभा खासदार प्रफुल पटेल, खासदार डॉ.प्रदीप पडोळे, आमदार राजू माणिकराव कारेमोरे, नरेंद्र भोंडेकर, परीणय फुके, पोलीस अधीक्षक नरुल हसन, पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, मुख्यधिकारी निलेश इंगोले, अॅड.पंकज तिडके, अॅड. दीप्ती पंकज तिडके नागपूर, अॅड.राकेश शिंदेघनसुर ताडगाव, डॉ.आशिष माटे, नरेश दिपटे, सदाशिव ढेंगे, अनिल गायधने, जि.प.सदस्य नरेश ईश्वरकर, देवेंद्र ईलमे, एकनाथ फेंडर, पं.स.सदस्य उमेश भोंगाडे, आशा बोंदरे, वंदना सोयाम, नगराध्यक्ष छाया डेकाटे, उपनगराध्यक्ष सचिन गायधने, नगरसेविका रेखा मनोहर हेडाऊ, वंदना क्रिष्णा पराते, उमेश मोहतुरे, इंजि.विपीन चौधरी चंद्रपूर हे राहतील.
आयोजित कार्यक्रमाचे उद्घघाटन बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष यशवंतराव ढबाले गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली अध्यात्मिक प्रमुख व मानवधर्म प्रचार व प्रसारीका लता दिलीप बुरडे यांच्या शुभहस्ते होईल. गुरुवारी दुपारी १.३० ते ३.३० वाजता मानव जागृती व अंधश्रद्धा निर्मूलन यावर परिसंवाद बाबा जुमदेवजीच्या शिकवणीवर मार्गदर्शक होईल. झाकीचे प्रथम बक्षिस २१ हजार रुपये विनोद शेंडे अकोलाटोला, व्दितीय बक्षीस १५ हजार रुपये टिकाराम बावणकर धाबेटेकडी, तृतीय बक्षीस ११ हजार अरुण बारई मोहाडी, चतुर्थ बक्षीस ९ हजार रुपये महादेव बुरडे पालोरा, पाचवा ७००० रुपये सुखदेव धांडे अकोलाटोला, सहावा बक्षीस ५ हजार रुपये आशा सतिश बोंदरे खडकी, सातवा ४ हजार ५०० रुपये विलास शेंडे अकोलाटोला, सविता तेजराम आंबीलकर मोहंगावदेवी, स्व.प्रभुदास पडारे स्मृतीप्रित्यर्थ कंठीराम पडारे सिहोरा, राजू माटे अकोलाटोला, स्व.मनोहर ठवकर स्मृतीप्रित्यर्थ वैभव ठवकर मोहगावदेवी, मानव सेवा भजन मंडळ मांडवी, कोमेश बुधा ठवकर मोहंगावदेवी, देवराव बारई मोहाडी यांच्याकडुन स्मृतीचिन्ह देण्यात येईल.
सायंकाळी ६ वाजता सांस्कृतीक कार्यक्रमाला सुरवात होईल. या कार्यक्रमास सर्व सेवक सेविकांनी व निमंत्रित पाहुण्यांनी उपस्थित राहून परमेश्वरी कृपेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक अध्यक्ष यशवंतराव ढबाले, उपाध्यक्ष नरेश सव्वालाखे, सचिव मोरेश्वर सार्वे, कोषाध्यक्ष कंठीराम पडारे, सहसचिव राजु पिल्लारे, संचालक नत्थु कोहाड, एकनाथ जिभकाटे, राजु माटे, गुरुदास शेंडे, रविकुमार मरस्कोल्हे, सरस्वता माटे,व्यवस्थापक भगवान पिल्लारे, शिपाई आकाश ठवकर, गिरजा कुंभारे, संगणक चालक लक्ष्मण माहुले, गिरजा कुंभारे यांनी केले आहे.
महानत्यागी बाबा जुमदेवजी ग्रामस्वच्छता अभियानाचा मोहाडीतुन शुभारंभ
विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यात मोहाडी येथे महानत्यागी बाबा जुमदेवजी ग्राम स्वच्छता अभियान बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी, नगरपंचायत मोहाडी, जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि.२९ जानेवारी २०२५ ला राबविण्यात आला. गुरुवार दि.३० जानेवारी २०२५ ला भव्य असे सेवक संमेलन आहे, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, मध्यप्रदेश येथून लाखोच्या घरात सेवकांची उपस्थिती राहणार आहे. भव्य अशी शोभायात्रा मोहाडी शहरातून निघणार आहे. आपणही सहभाग होऊन सेवक संमेलन मधे या, मार्गदर्शनाचा लाभ घ्या, जीवन सुखी बनवा, महानत्यागी बाबा जुमदेवजींनी दिलेल्या चार तत्त्व, तिन शब्द, पाच नियम या शिकवणीचा पालन करून जीवनाचा उध्दार करा असेही यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शनात सांगितले. सर्वांनी स्वत:चे आरोग्य जपा, काळजी घ्या, एकमेकांना सहकार्य करा, आपल्या गावाची, शहराची, परिसराची स्वच्छता ठेवा, रोगराई पासून स्वत:चा इतरांचा बचाव करा, आपले शरीर निरोगी राहील पाहिजे याकडे विशेष लक्ष द्या. या स्वच्छता अभियान अंतर्गत नवा संदेश सर्व गाव, शहर मधे जावू द्या, शासनाने स्वच्छ्ता, आणि आरोग्य विषयी दिलेल्या विशेष सूचना कडे लक्ष देवून पालन करा.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घघाटन मोहाडी पोलिस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष बेटाळा क्षेत्रातील जि.प.सदस्य नरेश ईश्वरकर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ब.प.पू.प.एक मंडळ उपाध्यक्ष नरेश सव्वालाखे, मोरेश्वर सार्वे सचिव, संचालक राजू माटे, एकनाथ जिभकाटे, नत्थु कोहाड, मोहाडी न.प. नगरसेविका सविता साठवणे, देवेश्री शहारे, वंदना पराते, दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे, सुनील मेश्राम, राजु बांते, उमेश मोहतुरे, सिराज शेख, महिला अध्यक्ष दुर्गा मेहर, अशोक बोंदरे, इंद्रपाल मते, भगवान पिल्लारे, शेषराव ठवकर, लक्ष्मण माहुले, श्रीकृष्ण झंझाड उपस्थित होते. बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी येथील संचालक मंडळ, सेवक, नगरपंचायत मोहाडी नगरसेवक, जिल्हा परिषद हायस्कुल मोहाडी तसेच परिसरातील सेवकगण मुख्य देखरेख समिती अध्यक्ष शेषराव ठवकर, राजू भोयर, भास्कर निंबार्ते, विलास शेंडे, प्रशांत मानापुरे, कौशिक कनोजे, यश गभने, दिपांश आगाशे, ज्ञानेश्वर बावणे, ललित कोहाड, विशाल ढेंगे, क्रिष्णा शेंडे, शंकर मेहर, शैलेश बारई, भुमेश्वर पारधी, राज सार्वे, रणधीर निमजे, संकेत पिंगरे, शिपाई आकाश ठवकर, महिला समितीचे अध्यक्ष म्हणून दुर्गा गौरीशंकर मेहर, उपाध्यक्ष भावना परमानंद थोटे, सचिव शालु सुरेश चिंधालोरे, कोषाध्यक्ष सविता तेजराम आंबिलकर मोहंगावदेवी, सहसचिव विद्या दिपक बोंदरे बोथली, सदस्य तनुजा सुर्यकिरण सव्वालाखे, वंदना मदन कनोजे मोहाडी,
रंजना लक्ष्मण ठोंबरे बेटाळा, कुंदा पदमानंद गभने मोहाडी, ज्योती इंद्रपाल मते इंदूरखा, ज्योती राजेश राखडे दहेगाव, अंजु राजु माटे अकोलाटोला, अल्का शैलेश भोंगाडे, मिना गणेश मेहर, भारती कैलाश तितीरमारे बोथली, सुरेखा ज्ञानेस्वर राऊत सुकळी, सविता राजेश पुडके, सोनु सुनिल बोंदरे, श्रध्दा प्रशांत मानापुरे, कुसुम विलास पाटील, मेघा नामदेव कोल्हे, ज्योती पदमकुमार गभने, कविता बालाराम साकुरे, सुभगा श्रीपत बाभरे बोथली, शालू प्रकाश निंबार्ते देव्हाडी, चंद्रकला सत्यवान निपाने, अनिता अनिल ठवकर पांजरा यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष नरेश सव्वालाखे यांनी केले. संचालन सचिव मोरेश्वर सार्वे यांनी केले तर उपस्थितांचे आभार उमेश मोहतुरे यांनी मानले.