भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : तुमसर तालुक्यातील नाका डोंगरी वन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या गर्रा बघेडा जंगल परीसरात वाघाच्या हल्ल्यात एक म्हैस व एक रेडा गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. घटनेच्या दिवशी संध्याकाळी सुसुरडोह पुनर्वसन येथील पशुपालन शेतकरी रंजीत नवलदास नैताम रा. गर्रा बघेडा, पांगडी जंगल परिसरात म्हशी जंगलालगत परिसरात चराई करीत असतांना सायंकाळी जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने म्हैस व रेड्याला गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली. त्यांच्यावर पा्रथमिक उपचार सुरू आहे. शेतकºयाच्या माहिती नुसार पुढील तपास क्षेत्र सहाय्यक जे.एस.बेले आणि बिट रक्षक आर.एस.कुंभरे हे करीत आहेत. यावेळी पोलीस पाटील सुसुरडोह पुस्तकला भलावी, माजी जिल्हा परिषद अशोक उईके यांनी सहकार्य केले. काही दिवसांपूर्वी याच पशुपालक शेतकºयांची एक म्हैस वाघाने ठार केली होती तर एक म्हैस जखमी केले होते. वनविभागाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे. वनविभागाने सध्या स्थितीत शेतकºयांनी आपले जनावरे जंगलात चारण्यासाठी नेवु नये असे आवाहन केले असून जनावरे रस्त्या लागत परिसरात चारावे अशा प्रकारे आवाहन केले आहे.