भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया तालुक्यातील खमारी या ग्रामपंचायत हद्दीत इंद्रकुमार गेंदलाल उके यांच्या घरी आज सकाळी ८ वाजेच्या सामुरास गॅस सुरू आताना अचानकच पाईप ला आग लागली, आग लागताच घरचे सगळे जण घराबाहेर निघाले. इतक्यातच आगीमुळे सिलेंडरचा स्फोट झाला व स्फोटाने घराला आग लागली. या आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. तर उके यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आग विझविण्यासाठी दोन दोन फायर ब्रिगेडच्या गाड्या घटना स्थळी दाखल झाले असून आग विझवण्यात आली त्या मुळे परिसरात असलेल्या दुस?्या घरापर्यंत आग पोहचू शकली नाही त्यामुळे मोठे अनर्थ टळले त्या मुळे आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र या आगी मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. तर आगी मुले झालेल्या नुकसानी शासनाकडून आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी करत आहेत.