उजव्या कालव्याला पाणी सोडा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गोसे जलप्रकल्प पूर्णत्वास आले असले तरीही याच्या उजव्या कालव्याचा लाभ शेतकºयांना मिळत नसल्याचे लक्षात येताच आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आज संबंधित अधिकाºयांची बैठक घेतली आणि उजव्या कालव्याच्या लाभार्थी शेतकºयांकरिता पाणी सोडण्या बद्दल खडसावून सांगितले. यावर संबंधित अधिकाºयांनी तीन दिवसात पाणी सोडण्याची हमी दिली असून आता या कालव्यावर निर्भर असलेल्या भंडारा, पवनी आणि ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकºयांना पिकाचे नुकसान सहन करावे लागणार नाही. यावेळी त्यांच्या सोबत चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया सुद्धा उपस्थित होते. गोसे जलप्रकल्पाच्या लाभ क्षेत्रास उजव्या आणि डाव्या अश्या दोन कालव्यात विभाजित करण्यात आले आहे. यातील उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रात भंडारा विधान सभाच नव्हे तर चिमुर विधानसभेचाही समावेश होतो.

दर वर्षी या क्षेत्रातील शेतकरी उजव्या कालव्याच्या पाण्याची मागणी करीत असतात परंतु संबंधित विभागाचे अधिकारी कालव्याच्या दुरूस्तीचे कारण पुढे करून पाणी देण्यास टाळत असत. या संबंधी शेतकºयांनी आ. नरेंद्र भोंडेकर यांच्याकडे दाद मागितली असता आ. भोंडेकर यांनी आज गोसे प्रकल्पाच्या संबंधित अधिकाºयांची तत्काळ बैठक आयोजित केली. नागपूर येथील सिंचन भावनात झालेल्या बैठकीत सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश पाटील व ब्रह्मपुरीचे कार्यकारी अभियंता हाटे यांच्यासह भंडारा, पवनी व ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. यावेळी उजव्या कालव्यातून पाणी न सोडण्याचे कारण विचारले असता अधिकाºयांनी उजवा कालवा डॅमेज असल्यामुळे रिपेअर करणे आवश्यक असल्याचे निदर्शनात आणून दिले. यावर शेतकºयांनी आमदार भोंडेकर यांना सांगितले की, गत वर्षी सुद्धा अधिकाºयांनी हेच कारण सांगून पाणी सोडण्यास नकार दिला होता आणि सिंचन अभावी पिकांचे नुकसान सहन करावे लागले होते.

सोबतच उपरोक्त तालुक्यातील शेतकºयांनी उजव्या कालव्याला पाणी सोडण्याचा आग्रह धरला, यावर आ. भोंडेकर यांनी अधिकाºयांना खडसावून सांगितले की शेतकºयांच्या पिकाला पाणी देणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे व शेतकºयांचे नुकसान होऊ नये या करिता गोसे खुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे रिपेरिंग व मेंटनस चे काम पुढे ढकलावे आणि या वर्षी कालव्यात पाणी सोडण्यात यावे. चर्चे अंती तीन दिवसात उजव्या कालव्याचे सर्वेक्षण व प्रत्यक्ष पाहणी करून कालव्याला पाणी सोडण्यात येणार असल्याची हमी अधिकाºयांनी आमदार भोंडेकर यांना दिली, सोबतच कालव्याचं रिपेरिंग व मेंटनसचे कार्य पुढच्या वर्षी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *