भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : महानत्यागी बाबा जुमदेवजीनी अहोरात्र परिश्रम करून दु:खी व कष्टी कुटुंबाला सुखाचा मार्ग दाखविला. मानव धर्मामुळे अनेक दु:खी कुटुंबाचा उद्धार झाला. बाबांनी चार तत्व, तीन शब्द, पाच नियमाची शिकवण सर्व सेवकांना दिली. अंधश्रद्धा तसेच व्यसनाने त्रासलेल्या कुटूंबाला योग्य मार्गदर्शन देऊन योग्य दिशा दाखविण्याचे कार्य महानत्यागी बाबा जुमदेवजीनी केले. शासनाला व्यसनमुक्त समाज करण्यास अपयश आले. मात्र महानत्यागी बाबा जुमदेवजीनी ते शीकवणीच्या माध्यमातून करून दाखविले. मानवधर्माची एक मोठी ओळख तयार झाली. मानवधर्माला अश्या वेळी साथ दिली पाहिजे. तरच सेवकांची प्रगती होईल. बाबांनी दिलेल्या शिकवणीचे पालन करणारा कुटुंब समाधानाने जीवन जगत आहे. राजकीय नेत्यांनी व्यसनमुक्त समाज करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. व्यसनमुक्त समाज घडला पाहिजे.
समाजातील अंधश्रद्धा दूर झाली पाहिजे. आपली मुले शिक्षण घेऊन मोठी झाली पाहिजेत. त्यांनी पण समाजाची सेवा केली पाहिजे. तरच देशातील अंधश्रद्धा व व्यसनीमुक्त समाज परत मानव धर्माच्या माध्यमातून पाहायला मिळेल कार्यक्रमाचे उद्घाटीका आध्यात्मिक प्रमुख तथा मानव धर्म प्रचार व प्रसारीका लता बुरडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. ते मोहाडी येथे भव्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष नरेश सव्वालाखे, सचिव मोरेश्वर सार्वे, कोषाध्यक्ष कंठीराम पडारे, सहसचिव राजू पिलारे, संचालक नत्थू कोहाड, एकनाथ जिभकाटे, राजू माटे, गुरुदास शेंडे, रविकुमार मरसकोल्हे, सरस्वता माटे तर विशेष अतिथी जि.प.सदस्य नरेश ईस्वरकर, पं.स.सदस्य उमेश भोंगाडे, आशा बोंदरे, नगरसेविका रेखा मनोहर हेडाऊ, वंदना कृष्णा पराते, देवश्री शहारे, परमानंद थोटे, इंजि.विपीन विलास चौधरी, लाडगे गुरुजी, लक्ष्मण डहारे, २२५ मार्गदर्शकांची उपस्थिती होती. प्रारंभी स्वागत गीत व बाबा जुमदेवच्या गीतावर कु.शिवानी बुरडे, कु.अनमिका नागा आकरे, कु.उर्वशी रमाकांत मलेवार, कु.स्नेहल पराग हिंगे, कु.श्रावणी रुपेश हिंगे, कु.रुतुजा मनोज भास्मे,कु.आकांशा संजय हिंगे निमखेडा यांनी प्रस्तुत केले.
सकाळी ९ ते १० वाजता सामूहिक हवन कार्य, सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत भव्य शोभायात्रा निघाली. आयोजित कार्यक्रमाचे उद्धघाटन बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एकसेवक मंडळाचे अध्यक्ष यशवंतराव ढबाले गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली अध्यात्मिक प्रमुख व मानवधर्म प्रचार व प्रसारीका लता दिलीप बुरडे यांच्या शुभहस्ते बाबा जुमदेव, हनुमान, आई वाराणशी यांच्या फोटोचे पूजन करून दिप प्रज्वलित करण्यात आले. पुढे बोलताना म्हणाले मोहाडी येथे बागेस्वर महाराज आले असताना परमात्मा एक सेवकांची पिढी नरकात जाणार म्हटले त्यावेळी आपले परमात्मा एक सेवक गप्प बसले होते. जिल्हातील एकही राजकीय नेत्यांनी आणि पत्रकारांनी आम्हाला सहकार्य केले नाही.यापुढे जिल्ह्यातील होणाºया परमात्मा एक सेवकांच्या कार्यक्रमात राजकीय पक्षाच्या नेत्यांना व्यासपिठावर आमंत्रित करू नये. जो परमात्मा एक सेवक असेल त्याच सेवकाला व्यासपीठावर बसू द्यावे. यानंतर आपल्या बाबा जुमदेवबद्दल कोणी अपशब्द बोलले तर कुठल्याही प्रकारची वाट न पाहता त्याची जागा दाखविली पाहिजे. आपण भारताचे नागरिक आहोत तर मतदान करणे कर्तव्यच आहे.
पण,यापुढे आपल्यावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा कोण आपल्यासाठी जो धावून येईल त्यालाच आपण मतदान करू हे परमात्मा एक सेवकांनी आतापासून मनात ठेवले पाहिजे असे मत लता बुरडे यांनी मार्गदर्शन करतांना व्यक्त केले. २०२५ मधील सत्कारपात्र भावना परमानंद थोटे, शालू सुरेश चिंधालोरे मोहाडी, राजाराम मारबते, श्रीकृष्ण झंझाड, गौरवपात्र सेवक खेमराज समरीत डोंगरगाव, मार्गदर्शक दुर्गाप्रसाद सुलाखे उमरी, लक्ष्मण ठोंबरे बेटाळा, नत्थु बांते गराडा यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष यशवंतराव ढबाले गुरुजी, उपाध्यक्ष नरेश सव्वालाखे, नरेश ईस्वरकर, राकेश शिंदेघनकर, धर्मदास बावनकुळे यांनी मनोगत व्यक्त केले. झाकीचे प्रथम बक्षिस २१ हजार रुपये विनोद शेंडे अकोलाटोला यांच्याकडून रामरतन बोंदरे सुकळी, व्दितीय बक्षीस १५ हजार रुपये टिकाराम बावणकर धाबेटेकडी यांच्याकडून गौरव शँकर पोटभरे कन्हान, तृतीय बक्षीस ११ हजार अरुण बारई मोहाडी यांच्याकडून सुमित डायरे वांगीहेटी, चतुर्थ बक्षीस ९ हजार रुपये महादेव बुरडे पालोरा यांच्याकडून रामरतन नागफासे जांब,पाचवा ७ हजार रुपये सुखदेव धांडे अकोलाटोला यांच्याकडून शालीकराम निकुळे मोहाडी, सहावा बक्षीस ५ हजार रुपये आशा सतिश बोंदरे खडकी यांच्याकडून रामेश्वर शेंडे मोहंगावदेवी, सातवा ४ हजार ५०० रुपये विलास शेंडे अकोलाटोला यांच्याकडून रघुनाथ ईलमे भिकारखेडा, आठवा रामेश्वर बोदरे देव्हाडा, नववा हंसराज बारई मोहाडी, दहावा संजय नागपूरे खुटसावरी यांना प्रदान करण्यात आले.
झाकीचे निरीक्षण सेवानिवृत्त तलाठी रामरतन ईलमे, शिक्षक वाघाये, काटेखाये, गायधने यांनी केले. सविता तेजराम आंबीलकर मोहंगावदेवी, स्व.प्रभुदास पडारें स्मृतीप्रित्यर्थ कंठीराम पडारे सिहोरा, राजू माटे अकोलाटोला, स्व.मनोहर ठवकर स्मृतीप्रित्यर्थ वैभव ठवकर मोहगावदेवी, मानव सेवा भजन मंडळ मांडवी, कोमेश बुधा ठवकर मोहंगावदेवी, देवराव बारई मोहाडी यांच्याकडून ट्राफि देण्यात आले. प्रास्ताविक सचिव मोरेश्वर सार्वे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन इंद्रपाल मते व तृप्ती योगेश दिवसे तर आभार प्रदर्शन उमेश भोंगाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक भगवान पिल्लारे, संगणक चालक लक्ष्मण माहूले, शिपाई आकाश ठवकर, गिरजा कुंभारे, श्रीकृष्ण झंझाड, विजय दमाहे, मुख्य देखरेख समिती अध्यक्ष शेषराव ठवकर, राजू भोयर, भास्कर निंबार्ते, विलास शेंडे, प्रशांत मानापुरे, कौशिक कनोजे, यश गभने, दिपांश आगाशे, ज्ञानेश्वर बावणे, ललित कोहाड, विशाल ढेंगे, क्रिष्णा शेंडे, शंकर मेहर, शैलेश बारई, भुमेश्वर पारधी, राज सार्व, रणधीर निमजे, संकेत पिंगरे, शिपाई आकाश ठवकर, महिला समितीचे अध्यक्ष दुर्गा गौरीशंकर मेहर, उपाध्यक्ष भावना परमानंद थोटे, सचिव शालु सुरेश चिंधालोरे, कोषाध्यक्ष सविता तेजराम आंबिलकर मोहंगावदेवी, सहसचिव विद्या दिपक बोंदरे बोथली,
सदस्य तनुजा सुर्यकिरण सव्वालाखे, वंदना मदन कनोजे मोहाडी, रंजना लक्ष्मण ठोंबरे बेटाळा, कुंदा पदमानंद गभने मोहाडी, ज्योती इंद्रपाल मते इंदूरखा, ज्योती राजेश राखडे दहेगाव, अंजु राजु माटे अकोलाटोला, अल्का शैलेश भोंगाडे, मिना गणेश मेहर, भारती कैलाश तितीरमारे बोथली, सुरेखा ज्ञानेस्वर राऊत सुकळी, सविता राजेश पुडके, सोनु सुनिल बोंदरे, श्रध्दा प्रशांत मानापुरे, कुसुम विलास पाटील, मेघा नामदेव कोल्हे, ज्योती पदमकुमार गभने, कविता बालाराम साकुरे, सुभगा श्रीपत बाभरे बोथली, शालू प्रकाश निंबार्ते देव्हाडी, चंद्रकला सत्यवान निपाने, अनिता अनिल ठवकर पांजरा आदींनी परिश्रम केले. सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरक्षादृष्टीने मोहाडी पोलीस स्टेशन ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे, उपनिरीक्षक नितीन मदनकर, सोमेश्वर सेलोकर, हवालदार मुकेश भोंगाडे, अतुल कुंभलकर, सुनिल हुकरे, सतीश सपकाळ, त्रिमूर्ती लांडगे, गिरीधर बोकडे, दुर्योधन भूरे, सचिन मालाधरे, अशोक लांजेवार, बारापात्रे, मेघा वैद्य, अर्चना साठवणे, देवेंद्र चोपकर, उमाकांत जोगेकर, रामरतन खोकले असे एकूण ३३ पोलीस कर्मचारी बंदोबस्तात होते. सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत भव्य महाप्रसाद वितरित करण्यात आले. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता सर्व शांततेत भव्य सेवक संमेलन व शोभायात्रा पार पडली.