भंडारा पत्रिका/भंडारा भंडारा : राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे हे दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौºयावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. सकाळी १०.०० वा. रवि भवन, नागपूर येथून शासकीय वाहनाने भंडारा सिल्क उद्योग प्रा. लि., ता. मोहाडी, जि. भंडारा येथे प्रयाण करतील. सकाळी ११.३० वा. भंडारा सिल्क उद्योग प्रा. लि., ता. मोहाडी येथे आगमन व आॅटोमॅटिक रेलिंग युनिट येथे भेट देतील. सकाळी ११.५० वा. भंडारा सिल्क उद्योग प्रा. लि., ता. मोहाडी येथून प्रयाण करतील. दुपारी १.१० वा. रेशीम मूलभूत सुविधा केंद्र, जमनी, ता. भंडारा, जि. भंडारा येथे आगमन व टसर व तुती रेशिम उद्योग पाहणी करतील आणि दुपारी १.३० वा. रेशीम मूलभूत सुविधा केंद्र, जमनी येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील. दुपारी १.४५ वा. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व नियोजन अधिकाºयांसोबत बैठक होईल. दुपारी २.०० वा. जिल्हा नियोजन समिती, भंडारा येथे बैठकीसाठी उपस्थित राहतील. संध्याकाळी ४.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथून शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. संध्याकाळी ५.०० वा. शासकीय विश्रामगृह, भंडारा येथून शासकीय वाहनाने भुसावळकडे प्रयाण करतील.