रोहयोच्या मजुरांचे २५ कोटी थकले; मजुरांवर आली उपासमारीची पाळी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : मागेल त्याला शंभर दिवस काम देण्याची हमी केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत दिली. परंतु या कामावर काम करणाºया लाखो मजुरांना मागील चार- पाच महिन्यांपासून मजुरी देण्यात आलीच नाही. गोंदिया जिल्ह्यातील मजुरांची २५ कोटी ५७ लाख ५१ हजार १९० रुपये मजुरी थकल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांनी कामाची मागणी करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागतो. रोहयोत सर्वात अधिक काम देण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल आहे. पण गोंदिया जिल्ह्यालाच रोहयोचे पैसे दिले जात नसल्याने मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना गावातच काम मिळावे, त्यांचे स्थलांतर थांबावे सोबतच विविध विकासात्मक कामे मार्गी लागावी, या हेतूने योजना राबविली जाते. यासाठी रोजगार हमी विभागाकडून ठिकठिकाणी कामे सुरू करण्यात आली आहेत. परंतु शासनाने पैसेच दिले नसल्याने मजुरांनी रोहयोच्या कामावर जाणे कमी केले आहे. १५ दिवस काम उपलब्ध करून देणे बंधनकारक असते. या कालावधीत मजुरांना काम न मिळाल्यास त्यांना नियमानुसार रोजगार भत्ता अदा केला जातो. ‘रोहयो’ अंतर्गत कामाची संख्या वाढल्याने गोंदिया जिल्ह्यात लाखो मजूर एकाच दिवशी कामावर असतात.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *