युनिव्हर्सल फेरो मॅग्निज खंबाटा कारखाना दोन दशकांपासून बंद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील माडगी येथील युनिव्हर्सल (खंबाटा) फेरो माँग्निज शुद्धिकरण करणारा कारखाना गत १९ वषार्पासून बंद आहे. सदर कारखाना त्वरीत सुरू करण्यात यावा किंवा कारखान्यासाठी संपादित शेतकºयांची ३०० एकर सुपिक जमीन त्यांना परत करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना शिवसेनेचे विभागप्रमुख अमित एच मेश्राम यांनी समस्त बेरोजगार कामगार व शेतकºयांच्या वतीने केली. तुमसर तालुक्यातील माडगी युनिव्हर्सल (खंबाटा) फेरो माँग्निज शुद्धिकरण करणारा कारखाना बंद असल्याने ३००० कामगार बेरोजगार झाले आहेत. या कारखान्यासाठी माडगी शिवारातील शेतकºयांनी आपल्या सुपिक जमीनी दिल्या होत्या. ३०० एकरात हा कारखाना उभारला गेला. अभय योजनेंतर्गत कारखान्याला १५० कोटी वीजबिल माफ करून सवलती देण्यात आल्या आहे. परंतु त्यानंतरही हा कारखाना सुरु झाला नाही.३५ वर्ष हा कारखाना सुरु होता. १८ आॅगस्ट २००६ पासून कारखाना कायमचा बंद आहे.

या कारखान्यावर सुमारे २०० कोटींचे वीज बिल थकित होते. यापूर्वी एनटीपीसी येथे सवलतीच्या दरात कारखान्याला वीज पुरवठा करीत होती. सवलतीच्या दरात वीज पुरवठा बंद केल्याने गुंता वाढला होता. वीज वितरणकंपनीने सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यास नकार दिला होता. कारखान्याकडे सुरुवातीला ५० कोटी रुपये थकीत होते. पुढे ती रक्कम वाढून २०० कोटी रुपयांपर्यंत गेली होती. दरम्यान कारखानदाराने १८ आगस्ट २००६ मध्ये क्लोजर करण्याचा निर्णय घेतला. २७८ कामगारांना क्लोजरची माहिती दिली. कारखाना सुरु राहावा यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्षाच्यावतीने प्रयत्न करण्यात आले. परंतु त्यात यश आले नाही. मात्र प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडली होती. राज्य शासनाने आजारी कारखान्यासाठी अभय योजना सुरु केली. त्यानुसार युनिव्हर्सल (खंबाटा) फेरोने २०१४ मध्ये अभय योजनेत समावेश करण्यात आला होता. त्यामुळे कारखान्यावरील वीज बिल आर्धे माफ करण्यात आले. कारखानदाराने २०० कोटींपैकी ४८ कोटी रुपयांचे देयक भरले. केवळ कारखाना सुरु करण्याच्या अटीवर अभय योजनेचा लाभ मिळेल, असा करारनामा करण्यात आला होता. कारखाना सुरु करण्यासाठी तीन वषार्ची मुदत देण्यात आली होती. २०१७ मध्ये तीन वर्षे लोटले तरीसुध्दा कारखानदाराने कारखाना सुरु केला नाही. कारखानदाराने कराराचा भंग केला आहे. कारखान्याकडे ३०० एकर सुपिक जमीन पडून आहे. कारखानदाराने कारखाना सुरु करावे, अन्यथा स्थानिक शेतकºयांचे त्या जमीनी परत कराव्यात अशी मागणी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभागप्रमुख अमित एच मेश्राम यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *