भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर शहरात अनेक वषार्पासून सुरू असलेल्या प्रथेनुसार प्रजासत्ताक दिनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्याद्वारे करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाबाबत स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष (अजित पवार) गटाच्या पदाधिकाºयांनी शासन व प्रशासनाकडे तक्रार केली असून त्यांच्यानुसार प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वज खांबाच्या वरून फडकवण्याऐवजी खालून वर नेल्याचा आरोप केलेला आहे. परंतु जिल्ह्यात अनेक शासकीय कार्यालयामध्ये अशाच प्रकारे ध्वजारोहण करण्यात आले आहे व विशेष म्हणजे जिल्ह्यातील मुख्य ठिकाणी माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते सुद्धा अशाच पद्धतीने ध्वजारोहण करण्यात आलेले आहे.
परंतु सदर पदाधिकाºयांनी याबाबतीत कोणत्याही पद्धतीची तक्रार न करता फक्त मुख्याधिकाºयांना लक्ष्य करण्यासाठी व त्यांच्यावर राजकीय दबाव आणण्यासाठी त्यांच्याविरुद्ध तक्रारकेल्याची चर्चा संपूर्ण शहरात आहे. वास्तविक तुमसर नगरपरिषदेत काही महिन्यापूर्वी रुजू झालेले मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या शिस्तप्रिय व कडक प्रशासकीय कार्यप्रणालीमुळे अनेक ठेकेदारांचे धाबे दणाणले असून त्यांचे नियमबाहय काम होत नसल्यामुळे त्यांनी हे षडयंत्र रचल्याची चर्चा सुद्धा शहरात आहे. वास्तविक ध्वज संहितेमध्ये स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाच्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीने ध्वजारोहण करण्याची पद्धत दिलेली नसूनही फक्त आपला विशिष्ट हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने ध्वज संहितेबद्दल संभ्रम निर्माण केला जात आहे. समाज माध्यमांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध जिल्ह्याच्या शासकीय कार्यक्रमात संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी अशाच पद्धतीने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वज खांबाच्या वरून फडकवण्याऐवजी खालून वर नेल्याचे दिसत आहे.