अवैध रेती चोर चालक, मालकांवर कारवाई; रेतीसह तीन ट्रॅक्टर जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव झाला नसताना नदी, नाले पात्रातून सर्रासपणे रेतीचा उपसा करून वाहतूक केली जात आहे. पोलिसांना रेती तस्करांवर कारवाईचा बडगा उगारत दि. ३० जानेवारी रोजी रेतीसह ३ ट्रॅक्टर जप्त करून वाहन मालक, चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुरूवारी पहाटे ४ च्या सुमारास तालक्यातील रावणवाडी पोलिस ठाणे हद्दीतील तेढवा गावा जवळील वैनगंगा नदीच्या पात्रामधुन अवैध रेती उत्खनन करणाºया तस्करांवर पोलिस पथकाने कारवाई केली. रेतीसह ३ ट्रैक्टर असा १५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चालक व ट्रॅक्टर मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा यांच्या निदेर्शाने उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीणी बानकर यांच्या मार्गदर्शनात रावणवाडीचे ठाणेदार वैभव पवार, सहायक पोलिस निरिक्षक सुनिल अंबुरे, अंमलदार संजय चौव्हाण, सुशिल मलेवार, छगन विठ्ठले, मनोज राऊत, कृष्णा कटरे यांनी केली. चुलबंद नदी घाटातून रेतीचा उपसा करून अवैधरित्या वाहतूक करणाºया टिप्परवर अर्जुनी मोरगावच्या महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांच्या पथकाने २८ जानेवारी रोजी नवेगावबांध येथे कारवाई केली. नवेगावबांधचे मंडळ अधिकारी उमराव वाघधरे, तलाठी भगवान नंदागवळी यांनी टिप्पर क्रमांक एमएच ३५ एजे २६३१ ला थांबवून पाहणी केली असता त्यात रेती आढळली. चालकाकडे रेजी वाहतुकीचा परवाना व टीपी आढळली नाही. ९ हजार रुपये किमतीची २ ब्रास रेतीसह १४ लाख किमतीचा टिप्पर जप्त केला आहे. याप्रकरणी वाहन मालक विक्रांत ताराचंद मेश्राम (४०), वाहनचालक अनमोल हरीदास शहारे (४२) दोन्ही रा. कनेरी, ता. सडक अर्जुनी यांच्यावर दंडात्मक कार्रवाई करुन वाहन तहसील कार्यालयात जमा केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *