समारंभात आलेल्या पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी केली गोवंशाची कत्तल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : लग्न आटोपले आणि दुसºया दिवशी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र या समारंभासाठी येणाºया पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी चक्क गोवंशाचे मास वाढण्याची तयारी सुरू होती. मांडवाच्या मागच्या बाजूला काही लोक गोवंशाची कत्तल करत होते. त्याचवेळी या मार्गाने महाविद्यालयात जाणाºया एका तरुणाने हा धक्कादायक प्रकार पाहिला आणि त्याचा व्हिडिओ चित्रित केला. त्यानंतर त्याने ताबडतोब विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना फोनद्वारे याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती देत घटनास्थळ गाठले. काही वेळात पवनी पोलिसही घटनास्थळी पोहचले असता या ठिकाणी गोवंशाचे ५० ते ६० किलो मास आढळून आहे. या प्रकरणी पवनी पोलिसांनी नवरदेवासह पाच आरोपींना रंगेहाथ पकडले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंग दल पवनी तालुका संयोजक प्रतीक कहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ७.३० वाजतादरम्यान बजरंग दलाचा कार्यकर्ता असलेल्या एका तरुणाचा मला फोन आला. त्याने स्वागत समारंभात लोकांना जेवणासाठी गोवंशाची कत्तल केली जात असल्याचे सांगितले. शिवाय एक चित्रफितही पाठवली. आम्ही पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि ताबडतोब चुटे रंग मंदिरामागील परिसरात जाऊन थांबलो.

जवळच असलेल्या लग्न मंडपाजवळ हा सर्व संतापजनक प्रकार सुरू होता. पोलीस काहीच क्षणात पोहचले. पोलिसांनी मासासह आरोपींना रंगेहाथ पकडले. आरोपींमध्ये नवरदेव इजाज निसार शाह (२८) याच्यासह रिझवान उर्फ इर्शाद निसार शाह (३०), रा. गौतम नगर वॉर्ड पवनी, मोशीम रमजान शेख (३७), रा. नांद/बेसूर ता. भिवापूर जिल्हा नागपूर, शरीफ हसन खान पठाण (३०), रा. भैतलाव वॉर्ड पवनी आणि इम्रान खान हकीम खान (३०) यांचा समावेश आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून सुमारे ४० ते ५० किलो मांस, एक लोखंडी हत्यार आणि कुºहाडीसह १६०० रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाईदरम्यान पवनी येथील लघु पशु वैद्यकीय सामान्य रुग्णालयाचे सहाय्यक आयुक्त भोयर यांनी हे मांस गाईचे असल्याचा अहवाल दिला व बजरंग दलाचे कार्यकर्ते निकेश गुलाब मानकर, कमलेश रामभाऊ पचारे, अपूर्व वामन तिघे, सौरभ खंडाळे, बंटी कुळमेथे, हिंदू धार्मिक गटांच्या वतीने भावना दुखावल्या गेल्याची तक्रार केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *