चाळीस लाख नऊ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मध्यप्रदेशातुन रेतीची अवैध वाहतुक करणाºया ट्रकवर सिहोरा पोलीसांनी कारवाई करुन ४०,०९,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन ट्रकचालकाचा ताब्यात घेण्यात आले. दि. ३० जानेवारी २०२५ रोजी सिहोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय कसोधन हे त्यांचे सहकारी कर्मचारी पो. हवा. राजु साठवणे, पो. शी. तिलक चौधरी यांचेसोबत गस्तीवर असतांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा सिहोरा येथे एक एलपी ट्रक क्र. एमएच ४० सीडी ६२७ मध्ये चालक अंकीतकुमार ददन यादव (३०) रा. दौलतपुर, त. जि. भोजपुर बिहार हा मध्यप्रदेशातुन अवैधरीत्या रेती भरुन महाराष्ट्र राज्यात वाहतुक करतांनी मिळून आल्याने त्यास रॉयल्टी बाबत विचारणा केली असता मध्यप्रदेशातील ई टिपी परवाना सादर केले परंतु महाराष्ट्र राज्यातील रेती वाहतुकीचा परवाना सादर न केल्याने सदर आरोपी हा त्याचे ट्रक मध्ये अवैधरित्या रेती भरुन महाराष्ट्र शासनाचे महसुल बुडवीण्याचे उद्देशाने रेतीची चोरटी वाहतुक करतांनी मिळुन आल्याने त्याचे ताब्यातुन ४.५ ब्रास रेती किमती ९००० रू. व एलपी ट्रक क्र. एमएच ४० सीडी ६२७ किंमत ४०,००,००० रुपये असा एकुण ४०,०९,००० रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी ट्रॅक्टर चालक याचेवर अपराध क्र. १५/२५ कलम ३०३ (२) भा. न्या. स. सन २०२३ सहकलम ४८ (८) जमीन महसुल संहीता सन १९६६ अन्वये गुन्हा नोंद करुन पुढील तपास पो. हवा. मनोज ईळपाते करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोफणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजय कसोधन ठाणेदार, पो. हवा. राजु साठवणे, पो. शी. तिलक चौधरी, पोहवा. छबीलाल शरणागत यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *