आता प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकावर ‘एसी वेटिंग रूम’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : प्रवाशांसाठी नवीन आणि आधुनिक उपक्रम म्हणून गोंदियारेल्वेस्थानकाच्या फलाट क्र. १ वर २७ जानेवारीपासून सशुल्क एसी प्रतीक्षालय सुरू करण्यात आले आहे. जुन्या प्रतीक्षालयाचे पूर्णपणे नूतनीकरण करून त्या जागी आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. विभागांतर्गत येणाºया गोंदिया स्थानकात प्रथमच ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. ज्याचा उद्देश सर्व वगार्तील प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित वातावरण प्रदान करणे, हा आहे.

प्रवाशांच्या आरामाची विशेष काळजी घेत प्रतीक्षालयात आरामदायी सोफे बसविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्रवाशांना आपला वेळ अधिक चांगल्या पद्धतीने घालविता यावा, यासाठी प्रतीक्षालयात टीव्ही व इतर मनोरंजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.प्रवाशांची सोय लक्षात घेता नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वेटिंग रूममध्ये उच्च दर्जाचे आणि स्वच्छ स्वच्छतागृह आणि वॉशरूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिलांच्या सोयीसाठी वेटिंग रूममध्ये स्वतंत्र बाळ काळजी कक्ष उपलब्ध आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *