नक्षल्यांकडून माजी पंचायत समिती सभापतीची हत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गडचिरोली : पोलिसांनी छत्तीसगड सीमेवरील पेनगुंडा व पाठोपाठ नेलगुंडा येथे पोलीस मदत केंद्र स्थापन केल्याने नक्षलवाद्यांची चारही बाजूने कोंडी झाली आहे. यातूनच पोलिसांना मदत करत असल्याचा आरोप करून नक्षल्यांनी कियेर (ता. भामरागड) येथील माजी पंचायत समिती सभापती सुखदेव मडावी (४५) यांची हत्या केली. २ फेब्रुवारीला सकाळी गावालगत मृतदेह आढळला. मृतदेहाजवळ नक्षल्यांनी एक पत्रक टाकले. त्यात मृत व्यक्तीने पेनगुंडा येथे पोलीस मदत केंद्र उघडण्यासाठी पोलिसांना मदत केल्याचा संशय केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. अतिदुर्गम भागातील नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला राहिलेल्या परिसरात त्यांच्या नाकावर टिच्चून पोलिसांनी अवघ्या एका दिवसात पोलीस मदत केंद्र उभारण्याची किमया केली.

डिसेंबर महिन्यात पेनगुंडा गावाजवळ पोलीस मदत केंद्र सुरु करण्यात आले. त्यानंतर नेलगुंडा येथे ३० जानेवारीला पोलीस मदत केंद्र उघडण्यात आले. यामुळे छत्तीसगडमधून गडचिरोली जिल्ह्यात सहज प्रवेश करणाºया माओवाद्यांची नाकाबंदी झाली होती. नक्षल्यांच्या प्रभाव क्षेत्रात पोलिसांची सुरक्षा व्यवस्था मजबूत होत असल्याने हिंसक चळवळीला मोठा धक्का बसला होता. दरम्यान, १ फेब्रुवारीला रात्री तीन नक्षल्यांनी कियेर गावातून माजी पंचायत समिती सभापती सुखदेव मडावी यांना उचलले व जंगलात नेले. तेथे त्यांची गळा दाबून हत्या केली. मृतदेहाजवळटाकलेल्या पत्रकात सुखराम मडावी हे पोलिसांचे खबरी असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षाभरातील नक्षलवाद्यांनी केलेली ही पहिलीच हत्या आहे. मृत व्यक्ती पोलिसांचा खबरी नव्हता. मृतदेहाजवळ सापडलेल्या पत्रकावरून तपास सुरू केला आहे. परिसरात नक्षलविरोधी अभियान गतिमान करण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *