भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : आरएसएस धार्मिक संस्था असून आमचा राजकारणाशी संबंध नाही, असे ते दावे करतात. पण भाजप राजकीय पक्ष असताना त्या पक्षाला मदत करण्यासाठी हे नेहमी समोर येतात. महाकुंभात भाजपने जो इव्हेंट उभा केला, त्यामुळे भाविकांचा मृत्यू झाला. या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार, आरएसएसने त्यावर खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
नागपुरात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, महाकुंभातील दुर्घटनेवर अद्याप आरएसएसने वक्तव्य का केले नाही. हिंदू रक्षक आरएसएसने प्रश्न विचारला नाही. वास्तिकता पुढे येऊ नये म्हणून मीडियाला तिथे जाण्यास बंदी केली. मृतदेह वाहून देण्यात आले. संतांचे टेंट जळत आहे, काही तरी गडबड तिथे सुरू आहे, अशी शंका त्यांनीव्यक्त केली.